Saturday, January 4, 2025

/

तोतया सीबीआय अधिकाऱ्याला बेळगावात अटक

 belgaum

बेळगाव लाईव्ह: आपण सीबीआय अधिकारी असल्याचे भासवून पैसे उकळणाऱ्या भामट्याला बेळगावच्या माळमारुती पोलिसांनी अटक केली आहे.

दयानंद रामू जिनराळ (वय : ३४, रा. हुक्केरी) नामक आरोपीला माळमारुती पोलिसांनी अटक केली आहे. या भामट्याने आपण सीबीआय अधिकारी असल्याचे तसेच ईडी, आयटी अधिकारी असल्याचे भासवून कोट्यवधी रुपये उकळून गंडवल्याच्या तक्रारी आहेत.

इतकेच नाही तर आपण पोलीस आयुक्तालयातील कर्मचारी असल्याचे सांगत लाखो रुपयांचा गंडाही तोतया अधिकाऱ्याने अनेकांना घातला आहे. एका रियल इस्टेट व्यावसायिकाची फसवणूक केल्यानंतर या प्रकरणाचा तपास करण्यात आला.Duplicate cbi

आरोपीने बेळगावसह रायबाग, चिक्कोडी, निपाणी, कागवाड आदी ठिकाणी फसवणूक करून लाखो रुपये उकळल्याचे तपासादरम्यान उघड झाले आहे. आरोपीला बेळगावच्या द्वितीय जेएमएफसी न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे.

माळमारुती पोलिसांनी केलेल्या या कारवाईचे शहर पोलीस आयुक्त याडा मार्टिन मारबानीयांग आणि कायदे व सुव्यवस्था विभागाच्या डीसीपी पी. व्ही. स्नेहा यांना कौतुक केले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.