बेळगाव लाईव्ह : जमिनीच्या वादातून अथणी तालुक्यातील दोघांमध्ये शस्त्राने मारामारी झाली. मात्र या घटनेत दोघांचाही जीव गेल्याची घटना घडली आहे. अथणी तालुक्यातील खोतवाडी येथील मनमंत रामचंद्र खोत (वय ३४) आणि खंडोबा तानाजी खोत (वय ३२) अशी मृतांची नवे आहेत.
दोघांमध्ये अनेक दिवसांपासून जमिनीवरून वाद सुरू होता. दरम्यान गावातील वडिलधाऱ्यांनी दोघांमध्ये तडजोड करूनही सोमवारी रात्री दोघांमध्ये शाब्दिक चकमक उडाली.
दोघांनीही एकमेकांवर शस्त्रे घेऊन वार केले. या हाणामारीत दोघेही गंभीर जखमी झाले. दोघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचाराअभावी रात्री उशिरा दोघांचाही मृत्यू झाल्याचे जाहीर करण्यात आले. अथणी पोलीस स्थानकाच्या हद्दीत हि घटना घडली आहे.