बेळगाव लाईव्ह :दोन वर्षांपूर्वी बेंगलोर येथे छ. शिवाजी महाराजांच्या मूर्तीचा अवमान झाल्यानंतर बेळगावमध्ये झालेल्या आंदोलन प्रकरणाच्या खटल्यात आज सोमवारी बेळगावच्या तृतीय जेएमएफसी न्यायालयासमोर तपास अधिकाऱ्यांची साक्ष नोंदवली गेली.
बेंगलोर येथे गेल्या 2022 मध्ये छ. शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचा अवमान करण्याची घटना घडली होती त्यावेळी त्याच्या निषेधार्थ बेळगावमधील शिवप्रेमींनी धर्मवीर संभाजी महाराज चौक येथे तीव्र आंदोलन छेडले होते.
सदर आंदोलनामुळे कायदा व सुव्यवस्थेचा भंग झाल्याचा आरोप ठेवून पोलिसांनी रमाकांत जयवंत कोंडुसकर, शुभम विक्रांत शेळके, प्रकाश रामचंद्र शिरोळकर, सरिता विराज पाटील, भारत लक्ष्मण मेणसे, नरेश राजू निलजकर, अंकुश अरविंद केसरकर, लोकनाथ उर्फ लोकेश जयसिंग रजपूत, हरीश प्रेमकुमार मुतगेकर, विनायक उर्फ तावर पिराजी कंग्राळकर आणि मदन बाबुराव बामणे यांच्यावर गुन्हा नोंदवला होता.
सदर केस नं. 34/22 संदर्भात आज सोमवारी न्यायालयासमोर तपास अधिकारी खडेबाजार पोलीस ठाण्याचे सहाय्यक उपनिरीक्षक बी. आय. पाटील यांचा जबाब नोंदवला गेला.
यावेळी सर्व आरोपी उपस्थित होते. तपास अधिकाऱ्यांच्या आजच्या साक्षीमुळे सदर खटल्यातील जवळपास सर्व साक्षीदारांच्या साक्षी नोंदविल्या गेल्या आहेत.
आता सदर खटल्याची पुढील सुनावणी येत्या 26 जुलै 2024 रोजी होणार आहे. आरोपींच्यावतीने ॲड. श्यामसुंदर पत्तार आणि ॲड. हेमराज बेंचन्नावर काम पाहत आहेत.