बेळगाव लाईव्ह : मंगळवार पेठ टिळकवाडी येथे सुरू झालेल्या बचपन प्ले स्कूलमध्ये छोट्या मुलांना व्यंगचित्रकार होण्याची संधी उपलब्ध करून दिली गेली आहे.
पिंक समोसा या क्रिएटिव्ह इव्हेंट आयोजित करणाऱ्या संस्थेच्या माध्यमातून ही संधी उपलब्ध करून देण्यात आली असून व्यंगचित्रकार होण्याची कला शिकण्याचे माध्यम बेळगावात मिळाले आहे.
गोवा येथील प्रसिद्ध व्यंगचित्रकार लॉरेन्स जोसेफ हे आपल्या पंधरा वर्षाच्या व्यंगचित्रकारीतेच्या अनुभवाचे प्रशिक्षण मुलांना देणार आहेत. यासाठी एक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
शनिवार दिनांक 6 रोजी सायंकाळी 4 ते 6.30 या वेळेत ही कार्यशाळा होणार असून यामध्ये सहभागी होण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
ज्या पालकांना आपल्या मुलांनी या क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा आहे तसेच काहींना छंद म्हणून ही कला शिकायची आहे अशांनी या कार्यशाळेत सहभागी व्हावे अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी 9663713823, 9742080727 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.