बेळगाव लाईव्ह : आपल्या कारमधून 1 कोटी 10 लाख रुपये घेऊन जात असताना एका तलाठीला पकडून पोलिसांनी त्याच्या जवळील रक्कम जप्त केली आहे. सदर रक्कम हे अनधिकृतरित्या नेण्यात येत असलेली पोलिसांच्या निदर्शनात आली.
बेळगाव जिल्ह्यातील रामदुर्ग तालुक्यातील हलगट्टी चेकपोस्टजवळ पोलिसांनी हि कारवाई केली. तलाठीची गाडी अडवून तपास केला असता त्यांना तलाठीच्या गाडीत हि बेहिशेबी रक्कम आढळून आली आहे.
निपाणी तालुक्यात तलाठीची सेवा बजावणारे विठ्ठल ढवळेश्वर यांच्या वाहनात ही रक्कम आढळून आली. ही रक्कम बागलकोट येथे नेण्यात येत असल्याची माहिती समोर आली असून रामदुर्गाचे डीवायएसपी एम पांडुरंग यांच्या नेतृत्वाखाली सदर कारवाई करण्यात आली आहे.
रामदुर्ग पोलीस स्थानकाच्या व्याप्तीत घडलेल्या या घटनेनंतर हि रक्कम कोणाच्या मालकीची आहे याचा तपस पोलीस अधिकारी करत आहेत.