Friday, September 20, 2024

/

मुसळधार पावसाने जिल्ह्यातील नद्या धोकादायक पातळीवर

 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगाव जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत असून जिल्ह्यातील नद्या धोकादायक पातळीवर पोहोचल्या असून जलाशये ओव्हरफ्लो झाली आहेत. नदीकाठच्या शेतजमिनीत पाणी शिरले असून पिके पाण्याखाली गेली आहेत. जिल्ह्यातील 22 पूल पाण्याखाली गेले असून 160 घरे कोसळली आहेत.

पश्चिम घाट प्रदेशात मुसळधार पाऊस सुरु असून परिणामी बेळगाव जिल्ह्यात देखील मुसळधार पाऊस सुरू आहे. कृष्णा, मलप्रभा, घटप्रभासह जिल्ह्यातील नद्या, नाले तुडुंब भरून वाहत असून खानापूर, गोकाक, मु डलगी, हुक्केरी, चिक्कोडी, निप्पाणी तालुक्यातील 22 पूल पाण्याखाली गेले आहेत. मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून विविध ठिकाणी घरांची पडझड झाली आहे.

दूधगंगा नदीवरील भोज-कारदगा पुलावर 16 फूट, मल्लिकवाड- दोनवाड पुलावर 13 फूट तर भोज जनवाड-निप्पाणी येथील खालच्या पुलावर 12 फुटांपेक्षा जास्त पाणी आले आहे.Flood

खानापूरमध्ये 55.4 मिमी, निप्पाणीमध्ये 37.4 मिमी, बेळगावमध्ये 22.7 मिमी, चिक्कोडीमध्ये 21.0 मिमी, कागवाडमध्ये 15.0 मिमी, रायबागमध्ये 16.5 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

पावसामुळे एकूण 160 घरांची अंशत: पडझड झाली आहे. खानापुर- 27, हुक्केरी- 11, बैलहोंगल- 2, कित्तूर- 22, सौंदत्ती- 26, रामदुर्ग- 41, गोकाक- 3, मुडलगी- 4, चिक्कोडी- 1, यरगट्टी- 20, अथणी- 2, निप्पाणी- 2 अशा पद्धतीने घरांची अंशतः पडझड झाली आहे.

तर खानापुर आणि सौंदत्ती येथील दोन घरे पूर्णपणे कोसळली आहेत. 51 हेक्टरवरील शेती पिकांचे तर 21.24 हेक्टरवरील फळबागांचे नुकसान झाले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.