Saturday, January 18, 2025

/

या रस्त्याच्या चौपदरीकरणाची घोषणा

 belgaum

बेळगाव लाईव्ह :गोव्यातील आधुनिक रस्ते कनेक्टिव्हिटीला महत्त्वपूर्ण चालना देण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी महत्त्वाची घोषणा केली.

शुक्रवारी मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ ते एनएच-166एस वरील धारगलपर्यंतचा 6 पदरी प्रवेश-नियंत्रित रस्ता लोकार्पण केला. या प्रकल्पाचे उद्दिष्ट या प्रदेशातील वाहतूक सुरळीत करणे आणि वाहतूक कार्यक्षमता वाढवणे हे आहे.Bgm punjim

मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ  ( मोपा)ते एनएच-166एस वरील धारगलपर्यंतचा 6 पदरी प्रवेश-नियंत्रित रस्त्याच्या उद्घाटनाप्रसंगी बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी 3500 कोटी रुपये खर्चून वडगाव ते कर्नाटक सीमेपर्यंत 45 कि.मी. लांबीचा बायपास रस्ता बांधण्याची घोषणा केली.

याव्यतिरिक्त मंत्र्यांनी राष्ट्रीय महामार्ग क्र. 748 च्या पणजी -बेळगाव दरम्यानच्या भागाचे चौपदरीकरण करण्याची योजना जाहीर केली. हा 52 कि.मी. अंतराचा भाग असून जो अंदाजे 4000 कोटी रुपये खर्चून विकसित केला जाणार आहे.

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्र्यांनी बेळगाव ते पणजी या रस्त्याच्या चौपदरीकरणाची घोषणा केली असली लवकर काम पूर्ण व्हावे  या रस्त्याची नितांत गरज आहे अशा भावना नेटकरी उपस्थित करताना दिसत आहेत.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.