बेळगाव लाईव्ह : बेळगावचे खासदार जगदीश शेट्टर यांनी आज केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची दिल्ली येथील कार्यालयात भेट घेऊन बेळगावातील सर्वांगीण रस्ते विकासासाठी निवेदन सादर केले.
या बैठकीत बेळगाव तालुक्यातील झाडशहापूर-होनगा दरम्यान बांधकाम सुरू असलेल्या बायपास रस्त्याच्या (रिंग रोड) बांधकामासाठी आवश्यक असलेल्या भूसंपादनाचे काम तातडीने हाती घेण्याची व संबंधित अधिकाऱ्यांना काम लवकर पूर्ण करण्याच्या सूचना देण्याचे आवाहन त्यांनी केले. याचप्रमाणे बेळगाव (शगनमट्टी) हुनगुंद, रायचूर दरम्यानच्या रस्त्याच्या कामासाठी आवश्यक असलेल्या भूसंपादनाचे काम तातडीने हाती घेऊन काम लवकर पूर्ण करावे,
बेळगाव शहराला जोडणाऱ्या अशोक सर्कल आणि राष्ट्रीय महामार्ग-4 ते कित्तूर राणी चन्नम्मा सर्कलला जोडणाऱ्या रस्त्यावर उड्डाणपूल बांधण्याबाबत कार्यवाही करण्याची आणि यापूर्वीच सादर केलेल्या ६०० कोटी रुपयांच्या प्रस्तावाला मंजुरी देण्याची विनंती करण्यात आली आहे.
कर्नाटक राज्य सरकार केंद्रीय रस्ता सुधारणा निधी योजनेअंतर्गत गोकाक धबधब्याजवळ केबल कार बांधण्यासाठी केंद्र सरकारकडे यापूर्वीच सादर केलेल्या प्रस्तावाला मंजुरी मिळविणे, ऐतिहासिक कित्तूर शहर आणि बैलहोंगल शहरादरम्यानच्या रस्त्याच्या सुधारणांसाठी कर्नाटक राज्य सरकारने केंद्र सरकारकडे यापूर्वीच सादर केलेला 160 कोटी रुपयांचा प्रस्ताव मंजूर करणे,
मूडलगी तालुक्यातील संकेश्वर संगम राज्य महामार्ग – 44 वरील 46 किमी आंतररस्त्याचा विकास, नरसापुर-होसकोटी-बड्डी-यादवाड आदी रस्त्यांच्या विकासाचा प्रस्ताव मांडून सर्व कामकाजासाठी मंजुरी आणि अनुदान देण्याची मागणी मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय परिवहन मंत्र्यांना केली.