Sunday, December 29, 2024

/

अस्वलाच्या हल्ल्यात शेतकरी जखमी

 belgaum

बेळगाव लाईव्ह :गुरे चारून घरी परतणाऱ्या एका वृद्ध शेतकऱ्यावर अस्वलाने हल्ला केल्याने तो गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी खानापूर तालुक्यातील देवराई गावाजवळ घडली आहे.

नारायण चावरी (65) असे अस्वलाने केलेल्या हल्ल्यात जखमी झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
या घटनेत अस्वलाने शेतकऱ्यावर पाठीमागून हल्ला करून, त्यांच्या पाठीला व डोक्याला दुखापत केली आहे.सदर घटना नागरगाळी वनपरिक्षेत्रातील देवराई गावाजवळ घडली.

याबाबत समजले अधिक माहितीनुसार शेतकऱ्यावर अस्वलाने हल्ला करताच आरडाओरडा केली त्यावेळी आरडा ओरड ऐकून, गावकरी नारायणच्या दिशेने धावून आले. त्यामुळे अस्वलाने नारायणला सोडून जंगलात पळ काढलीं.

जखमी अवस्थेत नारायणला ग्रामस्थांनी खासगी वाहनातून नंदगड येथील सामुदायिक आरोग्य केंद्रात दाखल करून प्राथमिक उपचार केले. घटनेची माहिती मिळताच एसीएफ सुनीता निंबरगी आणि आरएफओ नागराज बालेहोसूर यांनी नंदगड रुग्णालयात जाऊन नारायणला पुढील उपचारासाठी बेळगाव जिल्हा रुग्णालयात पाठवले आहे.

खानापूर तालुक्याचे आमदार विठ्ठल हलगेकर यांना याबाबतची माहिती मिळताच, त्यांनी वनखात्याच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून माहिती घेतली असून, जखमींला योग्य ते व अधिक उपचारासाठी बेळगाव येथील दवाखान्यात दाखल करण्यास सांगितले आहे. त्यामुळे पुढील उपचारासाठी त्यांना बेळगाव येथील दवाखान्यात हलविण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.