Friday, January 3, 2025

/

मृत वडिलांचे अवयवदान.. मुलीला मिळाले जीवदान…!

 belgaum

बेळगाव लाईव्ह : अपघातामुळे ब्रेन डेड झाल्याने सौंदत्ती येथील हिरेबुदनूर गावातील २४ वर्षीय हणमंत सारवी यांच्या कुटुंबीयांनी अवयव दानाचा निर्णय घेतला. या दुःखाचा सामना करत असूनही कुटुंबीयांनी घेतलेला अवयव दानाचा निर्णय कौतुकास्पद ठरला. या कुटुंबीयाने घेतलेल्या निर्णयामुळे हिरेबुदनूर गावात अवयवदानाविषयी जनजागृती निर्माण झाली.

पण नियतीने पुढे काही असे लिहून ठेवले कि.. वडिलांच्या निधनानंतर केलेल्या अवयवदानानंतर २ वर्षीय मुलीच्या हृदयात छिद्र असल्याचे निदान झाले. मात्र कुटुंबीयांची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने या मुलीच्या उपचारासाठी निधी उभारणे कुटुंबियांना शक्य नव्हते. मात्र रोटरी क्लब ऑफ बेळगाव (दक्षिण) च्या पुढाकारातून सदर मुलीला जीवदान मिळाले आहे.

केएलईएस डॉ. प्रभाकर कोरे रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या २४ वर्षीय हणमंत सारवी यांची मृत्यूशी झुंझ अपयशी ठरली. मात्र त्यांच्या निधनानंतर यकृत, मूत्रपिंड आणि नेत्रदान करण्याचा निर्णय त्यांच्या कुटुंबीयांनी घेतला होता.Hospital

यानंतर त्यांच्या २ वर्षीय मुलीला एट्रियल सेप्टल डिफेक्ट (ASD) या नावाने ओळखला जाणारा जन्मजात हृदयविकार असल्याचे निदान झाल्यामुळे कुटुंबाच्या दु:खात आणखी भर पडली. मात्र या मुलीवर उपचार करण्याचा निर्णय रोटरी क्लब ऑफ बेळगाव दक्षिणच्या “गिफ्ट ऑफ लाइफ” उपक्रमंतगर्त घेण्यात आला आणि ज्येष्ठ बालरोग हृदयरोगतज्ज्ञ डॉ. वीरेश मानवी यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. गणंजय साळवे आणि तज्ज्ञांच्या देखरेखीखाली तसेच कार्डियाक ऍनेस्थेटिस्टच्या टीमने डॉ. प्रभाकर कोरे रुग्णालयात ही शस्त्रक्रिया यशस्वी केली.

रोटरी क्लब बेळगाव दक्षिणचे सदस्य नीलेश पाटील, भूषण मोहित्रे, अनुदान समन्वयक चैतन्य कुलकर्णी आणि आरती अंगडी यांनी हॉस्पिटलला भेट देऊन मुलीच्या प्रकृतीची चौकशी करून कुटुंबियांना धीर दिला .

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.