Saturday, January 25, 2025

/

पर्यावरण दिनी जखमी भेकराला जीवदान

 belgaum

बेळगाव लाईव्ह :जंगलातून वाट चुकून गावात आलेल्या भेकरावर कुत्र्यांनी हल्ला चढविला. भेदरलेल्या अवस्थेत सैरावैरा पळणाऱ्या भेकराची कुत्र्यांच्या तावडीतून सुटका करून इदलहोंड (ता खानापूर) येथील युवकांनी तत्परता दाखवली.

आज सकाळी माळअंकले शिवारातून भेकराचे पिल्लू इदलहोंड गावात शिरले. कुत्र्यांनी त्याचा पाठलाग सुरू केला. मानेजवळ चावा घेतल्याने ते जखमी झाले होते. यावेळी गावातील तरुणांनी महत्प्रयासाने भेकराला पकडून खानापूरचे वनक्षेत्रपाल नागराज बाळेहोसूर यांना माहिती दिली. त्यांनी तातडीने वनरक्षक पुंडलिक पम्मार, शिवानंद औरादी, तानाजी पुजारी, नागेश गावडे यांना घटनास्थळी पाठवले.

जखमी भेकरावर त्याच ठिकाणी प्राथमिक उपचार करून पशु चिकित्सा केंद्रात नेण्यात आले. तेथे औषधोपचार करून सायंकाळी जंगलात सोडण्यात आले.Idalhond

 belgaum

वन्यजीवी जगले पाहिजे पर्यावरण टिकले पाहिजेत यासाठी पर्यावरण दिनी जखमी भेकराला जीवनदान देत सामाजिक संदेश देणाऱ्या या युवकांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

याकामी विजय पाटील, दत्ताजी पाटील, प्रशांत पाटील, तेजस पाटील, मनोहर जाधव, विनायक पाटील, व्यंकटेश पाटील, शंकर पाटील आदींनी परिश्रम घेतले. जागतिक पर्यावरण दिनी वन्य जीवाचे रक्षण करून युवकांनी दाखवलेल्या निसर्ग प्रेमाबद्दल वनक्षेत्रपाल बाळेहोसूर यांनी त्यांचे आभार मानले.

 

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.