बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहर परिसरात डेंग्यूचे रुग्ण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर गोजगा गावातील एका महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा डेंग्यूमुळे मृत्यू झाल्याची घटना घडली.
डेंग्यूमुळे निधन पावलेल्या युवकाचे नाव गणेश कल्लय्या जंगम (वय 17 रा गोजगा) असे आहे. गेल्या चार दिवसांपूर्वी ताप आल्यामुळे गणेश याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.
वैद्यकीय तपासणीत गणेश याला डेंग्यू झाल्याचे निष्पन्न होताच त्यावर उपचार सुरू करण्यात आले होते. मात्र उपचाराचा फायदा न होता आज त्याचे निधन झाले. गणेश जंगम हा सरदार कॉलेज शाळेत शिकत होता.
त्याच्या पश्चात आई वडील भाऊ असा परिवार आहे. गोजगा गावात ग्रामपंचायतीने परिसरात देखील स्वच्छता मोहीम राबवण्याची मागणी करण्यात येत आहे.
बेळगाव शहर परिसरात आणि तालुक्यात अनेक गावातून डेंगूची सात आली आहे डेंगू चे रुग्ण देखील वाढले आहेत त्यामुळे आरोग्य खात्याच्या वतीने सर्वांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.