बेळगाव लाईव्ह :बेळगाव शहर उपनगरांमध्ये आज शुक्रवारी वटपौर्णिमा भक्तीभावाने साजरी करण्यात आली. वटपौर्णिमेनिमित्त आज सुहासिनींनी वडाच्या झाडाचे पूजन करून आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली.
वटपौर्णिमेनिमित्त शहर आणि उपनगरातील वडाची झाडे असलेल्या ठिकाणी आज सकाळपासून सुहासिनी महिलांची गर्दी पहायला मिळत होती.
शहरातील समादेवी गल्लीसह विविध ठिकाणी असलेल्या वटवृक्षाचे भक्तीभावाने पूजन करून त्याला दोऱ्याचे गुंफण बांधण्याद्वारे महिलावर्ग आपल्या पतीसाठी दीर्घायुष्य चिंतताना दिसत होता.
वटपौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर कालपासून बाजारपेठेत छोटे आंबे, आरसा -फणी, वाण, सुत, हळदीकुंकूचे करंडे, मणी मंगळसूत्र, पूजेसाठी लागणारी पाच प्रकारची छोटी फळे वगैरेंची खरेदी-विक्री तेजीत होती.
त्यामुळे संबंधित विक्रेत्यांकडे महिलावर्गाची लक्षणीय गर्दी झाल्याचे दिसत होती.