बेळगाव लाईव्ह :धावत्या दुचाकी वर झाड कोसळून दोन तरुण ठार झाले. त्यापैकी एकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर पाठीमागे बसलेले दोघेजण जखमी झाले होते. पैकी एकाचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला.
रविवारी सकाळी दहाच्या सुमारास कर्ले- बेळगुंदी रस्त्यावरील बेळगुंदी स्मशानभूमीजवळ ही घटना घडली. सोमनाथ रवळू मुचंडीकर (वय 20, रा. कर्ले) आणि विठ्ठल नाईक असे मृतांची नावे आहेत.
सोमनाथ, विठ्ठल व आणखी एक मित्र कर्लेहून कामानिमित्त बेळगुंदीला जात होते.
बेळगुंदी जवळील स्मशानभूमी जवळ आकेशियाची दोन्ही बाजूला भरपूर झाडे आहेत. यातील एक झाड दुचाकी चालवत असलेल्या सोमनाथच्या अंगावर कोसळले. त्याच्या डोकीला गंभीर दुखापत होऊन तो जागीच ठार झाला.
पाठीमागे बसलेल्या अन्य दोघांनाही जबर मार लागला आहे. त्यांच्यावर उपचार सुरू असताना विठ्ठलचा मृत्यू झाला. दुचाकीचीही मोठे नुकसान झाले आहे. या घटनेने बेळगाव तालुक्यावर शोक कळा पसरली असून दोन तरुण दगावल्याने सर्वत्र दुःख व्यक्त होत आहे.
सकाळपासूनच जिल्हा रुग्णालयात शव गारा जवळ अनेक नागरिकांनी गर्दी केली होती पीडित कुटुंबाचे अनेकजण सांत्वन करत होते.