बेळगाव लाईव्ह : मागील चार ते पाच दिवसापासून पडलेल्या पावसाने आता पुन्हा सुरुवात केली आहे त्यामुळे शेतकरी वर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे याचबरोबर पेरणी झालेल्या पिकांना पोषक वातावरण निर्माण झाल्याने शेतकऱ्यातून समाधान व्यक्त होत आहे.
गुरुवारी दुपारनंतर झालेल्या पावसाला अचानकपणे सुरुवात झाली या पावसामुळे काही प्रमाणात पुन्हा पाण्याची टंचाई दूर होण्याची शक्यता आहे तर मागील वर्षी पडलेल्या दुष्काळामुळे अनेकांना टँकरचा आधार घ्यावा लागला होता हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार जोरदार पाऊस होईल अशी अपेक्षा होती मात्र यावर्षी अधून मधून सरी कोसळू लागले आहेत गुरुवारी शहर परिसरात दमदार पावसामुळे साऱ्यांनाच दिलासा मिळाला आहे.
गुरुवारी दुपारनंतर अचानक झालेल्या पावसाने बेळगाव शहरात भाजी मार्केटला खरेदीसाठी आलेल्या लोकांना आडोसा घ्यावा लागला बेळगाव शहर परिसरात अजूनही काही ठिकाणी पेरणे अपूर्णच आहेत मात्र या पावसाने वसंत घडल्यानंतरच त्या पेरण्या आता शेतकऱ्यांकडून केला जाणार आहेत.
गेल्या काही दिवसात पाऊस न झाल्याने काही भात पिकांची कोळपणी झाली आहेत त्या भात पिकाला आता पोषक वातावरण निर्माण झाले आहे. दुष्काळ परिस्थितीमुळे आणि विश्रांती घेतलेल्या पावसामुळे काही ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करावा लागणार का अशी परिस्थिती निर्माण झाली होती दरम्यान गुरुवारी पडलेल्या पावसामुळे अनेकांना दिलासा मिळाला आहे तर शहर परिसरात याचबरोबर शेती शिवारात ही या पावसाचा फायदा झाला आहे.
मागील काही दिवसात वादळी वाऱ्यासह पावसाचे आगमन झाले त्यामुळे झाडे कोसळली होती आणि अनेक प्रकारचे नुकसान झाले होते मात्र जूनच्या 20 नंतर सुरू झालेल्या या पावसाने मान्सूनची खरी सुरुवात झाल्याचे अनुभवायला मिळत आहे.