Thursday, January 9, 2025

/

बेळगावचे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल लवकरच सुरू होणार : मंत्री सतीश जारकीहोळी

 belgaum

बेळगाव लाईव्ह : बहुप्रतीक्षित असणारे बेळगावचे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल लवकरच सुरु करण्यात येणार असून वैद्यकीय शिक्षण विभागाने सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलसाठी कर्मचाऱ्यांची भरती आणि वैद्यकीय उपकरणांची तरतूद करण्याबाबत मंत्र्यांशी चर्चा केली आहे अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच बेळगाव जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिली.

वैद्यकीय मंत्री डॉ. शरण प्रकाश पाटील यांच्या संयुक्त विद्यमाने बेळगाव इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसच्या (बिम्स) विकास कामांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते.

यावेळी बोलताना सतीश जारकीहोळी म्हणाले, बीम्स परिसरात 188 कोटी खर्चून बांधलेले बेळगाव सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल लवकरच सुरू होणार, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलसाठी 570 ए-गट, ब-गट कर्मचारी नियुक्त करण्यासाठी.वर्षाकाठी 38 कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याकडून सदर निधीसाठी मंजुरी घेऊन कारवाई केली जाईल. तसेच या रुग्णालयासाठी 570 ए-गट, ब-गट कर्मचारी नियुक्त करण्यासाठी प्रक्रिया सुरु करण्यात येत असल्याचेही पालकमंत्र्यांनी सांगितले.

सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये न्यूरोलॉजी, न्यूरोसर्जरी, प्लास्टिक सर्जरी, एंडोक्राइनोलॉजी, गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी, नेफ्रोलॉजी आणि सर्जिकल गॅस्ट्रोएन्टेरोलॉजीसह इतर आरोग्य सेवा देण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांच्या सुविधा उपलब्ध असतील. नवीन हॉस्पिटलमध्ये दर्जेदार आरोग्य सेवा देण्याचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.

बिम्सच्या आवारात नर्सिंग वसतिगृह आणि 450 खाटांच्या टीचिंग हॉस्पिटलची इमारत बांधण्याबाबत वैद्यकीय मंत्री डॉ. शरण प्रकाश पाटील यांच्याशी चर्चा केल्याची माहिती मंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिली, त्याचवेळी त्यांनी बेळगावातील बिम्सच्या विकासाला गती देऊन कामे लवकर पूर्ण करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. .

यावेळी बेळगाव बिम्सचे संचालक अशोककुमार शेट्टी, मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. सिद्दू हुल्लोळ्ळी यांच्यासह वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.