बेळगाव लाईव्ह :प्रतिवर्षाप्रमाणे मराठी भाषा प्रेरणा मंचच्यावतीने खानापूर तालुक्यातील दहावीच्या परीक्षेत यश मिळविलेल्या यशस्वी गुणानुक्रमे पहिल्या दहा विद्यार्थ्यांचा रोख रक्कम प्रशस्तीपत्र ,स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन गौरिण्यात आले.
जांबोटी येथील माध्यमिक विद्यालयात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जांबोटी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष विलास बेळगावकर हे होते. विद्यार्थिनींच्या स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
मराठी भाषा प्रेरणा मंचचे अध्यक्ष डॉ. प्रा. गोपाळ पाटील यांनी सर्वांचे स्वागत करून प्रास्ताविकात कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. पाहुण्यांचा परिचय शिवाजी हसनेकर यांनी करून दिला. सुरेश पाटील यांनी पाहुण्यांना पुष्पगुच्छ दिले. त्यानंतर जि. पं. माजी सदस्य विलास बेळगावकर यांनी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उ्द्घटन केले. श्री सरस्वती प्रतिमेचे पूजन जांबोटी हायस्कूलचे सहायक शिक्षक डी. आर. पाटील यांनी केले.
यावेळी विलास बेळगावकर, सुनील चिगुळकर, डॉ. प्रा. गोपाळ पाटील यांचा हस्ते गुणी विद्यार्थ्यांचा बक्षिसे देऊन सत्कार करण्यात आला. कणकुंबी येथील श्री माऊली हायस्कूलचे मुख्याध्यापक सुनील चिगुळकर व डी. आर. पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केल्यानंतर विलास बेळगावकर यांचे अध्यक्षीय भाषण झाले.
मराठी भाषा प्रेरणा मंचचे सचिव अरुण कदम यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर अभियंता अशोक चौगुले यांनी आभार मानले. यावेळी खानापूर तालुक्यातील मोनेश गावडे, नेहा कदम, मधुराणी मालशेत, सानवी कोळी, बाळकृष्ण पाटील, रेश्मा गोरल, नेहा चव्हाण, साक्षी गुरव, महादेव गोरल, अपर्णागावडे, श्रावणी पाटील, तनुजा देसाई यांना सन्मानित करण्यात आले.