बेळगाव लाईव्ह : २०२३ – २४ या शैक्षणिक वर्षात झालेल्या दहावी परीक्षेचा निकाल मे महिन्यात जाहीर करण्यात आला.
या निकालात बेळगाव शैक्षणिक जिल्हा व शहरामध्ये सेंट मेरीज हायस्कूलची विद्यार्थिनी तनिष्का नावगेकर हिने 620 गुण घेऊन प्रथम क्रमांक पटकाविला होता फेर तपासणी देखील अनेक विद्यार्थ्यांना वाढवून मिळाले आहेत तिला 622 म्हणजेच 99.50 % गुण मिळाले असून त्यातही तनिष्का हिनेच बाजी मारली असून तिचा जिल्ह्यात प्रथम क्रमांक आला आहे.
*तनिष्का नावगेकरच जिल्ह्यात प्रथम*
बेळगाव -नुकत्याच झालेल्या दहावीच्या परीक्षेत डीपी शाळेची श्रेया लाड ही फेर तपासणीनंतर प्रथम आल्याचे काल आम्ही जाहीर केले होते. पण त्याच वेळेला सेंट मेरी शाळेची तनिष्का नावगेकर या विद्यार्थिनींनीही आपल्याला मिळालेले गुण कमी असून त्याची फेर तपासणी करावी असा अर्ज बोर्डाकडे गेला होता त्यानुसार बोर्डाने फेर तपासणी करून तिचे कन्नड विषयात दोन गुण वाढून दिले त्यामुळे तिला 622 99. 50 % गुण मिळाल्याचे बोर्डाने कळविले आहे. त्यामुळे तनिष्का नावगेकर हीच जिल्ह्यात प्रथम आली.
डीव्हाइन प्रॉव्हिडन्स शाळेची श्रेया लाड या विद्यार्थिनीने आपल्याला कमी गुण मिळाल्याचे लक्षात घेत पुन्हा एकदा फेरतपासणीसाठी अर्ज केला होता.
.
डिव्हाईन प्रॉव्हिडन्स या शाळेची विद्यार्थिनी श्रेया सतीश लाड हिने दहावी परीक्षेत ६२१ गुणांसह मिळवत ९९.३६ टक्के मिळविले आहेत. इंग्लिश १२२, कन्नड १००, हिंदी १००, गणित ९९, विज्ञान १००, सामाजिक विज्ञान १०० असे एकूण ६२१ गुण मिळविल्याचे फेरतपासणीत निष्पन्न झाले आहे.
उद्यमबाग येथील श्रीयश एंटरप्राईजेस उद्यमबाग बेळगाव मालक आणि भवानी नगर येथे वास्तव्यास असणाऱ्या सतीश लाड यांची ती कन्या होय.