Friday, July 19, 2024

/

हुबळीचे वर्चस्व! तीन खासदार

 belgaum

बेळगाव लाईव्ह:लोकसभा निवडणुकीमध्ये उत्तर कर्नाटका मधून निवडून आलेल्या खासदारांपैकी तब्बल तीन खासदार हुबळी शहरातील रहिवाशी आहेत.

कर्नाटकाचा राजकारण चालवणारी सुवर्ण विधानसौध जरी बेळगाव मध्ये असली तरी उत्तर कर्नाटकाचे राजकीय शक्ती केंद्र म्हणून हुबळीचे महत्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले

प्रल्हाद जोशी हे हुबळीच्या मयुरी इस्टेट येथील निवासी असून ते धारवाडचे खासदार आहेत. या पद्धतीने प्रल्हाद जोशी विक्रमी पाचव्यांदा खासदार म्हणून संसदेत गेले आहेत. या खेरीज माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचे घर आदर्शनगर हुबळी येथे आहे. बोम्मई हे शेजारील हावेरी लोकसभा मतदार संघातून खासदार झाले आहेत.Hubli

त्याचप्रमाणे मधुरा इस्टेट, हुबळीचे आणखी एक रहिवासी माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर हे आता बेळगावचे खासदार झाले आहेत. माजी मुख्यमंत्री असलेले शेट्टर व बोम्मई हे दोघेही पहिल्यांदाच खासदार बनत आहेत.

थोडक्यात खासदार होणारे दोन माजी मुख्यमंत्री हे हुबळीचे आहेत. हुबळीने यापूर्वी एस. आर. बोम्मई, जगदीश शेट्टर आणि बसवराज बोम्मई यांच्या स्वरूपात कर्नाटकला तीन मुख्यमंत्री दिले आहेत. एकंदर या वेळच्या लोकसभा निवडणुकीमुळे हुबळीचे महत्त्व वाढले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.