बेळगाव लाईव्ह :शालेय विद्यार्थ्यांना नियम करणाऱ्या वर्दीवाल्या ऑटो रिक्षा चालकांसाठी सरकारने दरमहा प्रति बालक दर आणि प्रति ऑटो मुलांची संख्या निश्चित करावी आणि शाळेच्या वेळेत सरकारी बस सेवा वाढवावी अशी मागणी करण्याबरोबरच एकंदर याबाबतीत सरकारने कायमस्वरूपी तोडगा काढला पाहिजे असे मत, सामाजिक कार्यकर्ते आणि फेसबुक फ्रेंड्स सर्कलचे प्रमुख संतोष दरेकर यांनी व्यक्त केले आहे.
शालेय विद्यार्थ्यांना करणाऱ्या वर्दीवाल्या ऑटो रिक्षाचालकांवर आज शनिवारी सकाळी रहदारी पोलिसांकडून कारवाई करण्यात आली. या कारवाई जवळपास 30 ऑटोरिक्षा जप्त करण्यात आल्या. या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते संतोष दरेकर यांनी वर्दीवाले ऑटो रिक्षा चालक आणि पालक, विद्यार्थ्यांच्या हितार्थ पुढील प्रमाणे आपले मत व्यक्त केले आहे.
पालकांकडून दिल्या जाणाऱ्या खूपच कमी किंवा किमान मासिक रक्कमेच्या आधारे वर्दीवाल्या ऑटो रिक्षा चालकांना पेट्रोल दर वाढ, रोड टॅक्स, विम्याचा हप्ता आणि ऑटो देखभाल या गोष्टी सांभाळून स्वतःचे कुटुंब चालवावे लागते. मुलांना शाळेत सोडल्यानंतर शाळेची ऑटो दिवसभर शाळेजवळ थांबते.
दुसरीकडे वर्दीवाल्या रिक्षाचालकांचे ऑटो चालक मित्र प्रवासी मिळवून चांगला व्यवसाय करत असतात. अनेक मुलांचे पालक मध्यमवर्गीय कुटुंबातील असल्यामुळे वर्दीच्या ऑटो रिक्षाचे भाडे वाढवून देणे त्यांना परवडत नाही. यासाठी शालेय विद्यार्थ्यांना ने-आण करणाऱ्या ऑटोरिक्षांचे भाडे सरकारने निश्चित केले पाहिजे आणि प्रति ऑटो मुलांची संख्या देखील वाढवून निश्चित केली पाहिजे. जेणेकरून पालक आणि ऑटो मालक दोघांसाठीही दिलासादायक परिस्थिती असेल. शाळा वर्दीसाठी कांही ऑटो भाड्याने दिल्या जातात.
आजकाल सर्व खाजगी शाळांनी आपल्या स्कूल बसेस सुरू केल्या आहेत. त्यामुळे वर्दीवाल्या ऑटो रिक्षा चालकांचा व्यवसाय तोट्यात चालला आहे. एकंदर परिस्थितीत आपल्या कुटुंबाचा चरितार्थ कसा चालवावा? हा गहण प्रश्न या वर्दीवाल्या ऑटो रिक्षा चालकांसमोर आहे. याचा सहानुभूतीने विचार करून सरकारने प्रति बालक प्रति महिना एक मानक दर आणि प्रति ऑटो मुलांची संख्या निश्चित करणे आवश्यक आहे. ज्यामुळे पालक व रिक्षा चालकांना दिलासा मिळेल.
या खेरीज रहदारी नियमांचे काटेकोर पालन व्हावे यासाठी तत्पर असणाऱ्या पोलिसांनी सरकारी बसेसमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरण्याच्या प्रकाराकडे ही गांभीर्याने लक्ष देऊन कारवाई करावी. कारण समाज माध्यमांवर या संदर्भात सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मुलांना वेळेत शाळेत पोहोचता यावे यासाठी शासनाने शाळेच्या वेळेत सरकारी बसेस वाढवाव्यात.
तसेच सर्व सरकारी बसेसना सुरक्षा दरवाजे असावेत. जेणेकरून मुले पायऱ्यांवर बसच्या बसू नयेत. सरकारने या पैलूचाही विचार केला करावा असे स्पष्ट करून फक्त वाहन चालकांना दंड करून चालणार नाही, तर कायमस्वरूपी तोडगा काढणे आवश्यक आहे, असे मत सामाजिक कार्यकर्ते संतोष दरेकर यांनी व्यक्त केले आहे.
केवळ समाज माध्यमावर समस्या मांडून थांबणार नाही तर अधिकारी दरबारी याचे फॉलोअप देखील केले पाहिजे याच हेतने दरेकर यांनी अधिकाऱ्यांची देखील या संदर्भात संवाद सुरू केला आहे.