बेळगाव लाईव्ह : राज्यात कोणत्याही कारणाने मुख्यमंत्री बदल होणार नाही. अतिरिक्त उपमुख्यमंत्रीपदाची इच्छा व्यक्त करणाऱ्यांवर हायकमांडने कडक कारवाई करावी, असे मत माजी मंत्री आर.व्ही.देशपांडे यांनी व्यक्त केले.
बेळगाव मधील सुवर्ण विधानसौध येथे शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मुख्यमंत्री राज्यात सुशासन देत आहेत. राज्यात सिध्दरामय्यांच्या नेतृत्वाखालील सरकार स्थिर आहे.
राजकारणात पक्षात मतभेद असतात याचा अर्थ मुख्यमंत्री बदलतील असा नाही, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ आमदार आर.व्ही.देशपांडे यांनी व्यक्त केली. राज्यात सिध्दरामय्यांच्या नेतृत्वाखालील सरकार स्थिर आहे.
राजकारणात पक्षात मतभेद असतात याचा अर्थ मुख्यमंत्री बदलतील असा नाही. उपमुख्यमंत्रीपदाबाबत जाहीरपणे चर्चा करणे योग्य नाही. या विषयावर जाहीरपणे बोलणाऱ्यांवर हायकमांडने शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी प्रतिक्रिया आर. व्ही. देशपांडे यांनी व्यक्त केली.