बेळगाव लाईव्ह :बेळगाव दक्षिण विभागातील उपनोंदणी कार्यालयासाठी आता पूर्ण वेळ उपनोंदणी अधिकारी मिळाले असून आनंद बदनीकाई यांनी गेल्या मंगळवारी उपनोंदणी अधिकारी म्हणून अधिकार पदाची सूत्रे हाती घेतली आहेत.
लोकसभा निवडणूक काळातच सदर कार्यालयात विष्णूतीर्थ यांची उपनोंदणी अधिकारी म्हणून नियुक्ती झाली होती. तथापि ते 31 मे रोजी सेवानिवृत्त झाल्यानंतर या कार्यालयात पूर्ण वेळ उपनोंदणी अधिकारी नियुक्त झाले नव्हते.
याच कार्यालयातील प्रथम दर्जा सहाय्यक सचिन मंडेद यांची प्रभारी उपनोंदणी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. गेले अनेक महिने ते प्रभारी उपनोंदणी अधिकारी म्हणून कार्यरत होते.
मात्र आता बेळगाव दक्षिण विभाग उपनोंदणी कार्यालयाचे पूर्ण वेळ उपनोंदणी अधिकारी म्हणून आनंद बदनीकाई यांची नियुक्ती झाली असून त्यांनी गेल्या मंगळवारी प्रभारी उपनोंदणी अधिकारी सचिन मंडेद यांच्याकडून पदभार स्वीकारला.
बेळगाव शहरातील काही भाग तसेच बेळगाव दक्षिण विधानसभा मतदारसंघातील कांही गावे या उपनोंदणी कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात येतात.