Saturday, September 21, 2024

/

बेळगावसह राज्यात ठिकठिकाणी अतिवृष्टीची शक्यता

 belgaum

बेळगाव लाईव्ह :कर्नाटकातील किनारपट्टी आणि लगतच्या जिल्ह्यांमध्ये आज शुक्रवार दि. 21 ते मंगळवार दि. 25 जून 2024 या कालावधीत जोरदार पाऊस किंवा अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. या कालावधीत जोरदार वाऱ्यासह दरडी कोसळण्याचीही शक्यता आहे.

कर्नाटकसाठी पुढील सात दिवसांचा हवामान अंदाज, गडगडाटी वादळाचा इशारा: दिवस 1 (21 जून 2024) -किनारपट्टीच्या कर्नाटकातील जिल्ह्यांमध्ये विलग मुसळधार ते अति मुसळधार किंवा मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्यवर्ती कर्नाटकातील शिमोगा, चिक्कमंगळूरू, कोडगु आणि बेळगाव जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांशी संबंधित विलग मुसळधार पाऊस अथवा मेघगर्जनेसह (40-50 कि.मी. ताशी) सरी कोसळण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे हलका ते मध्यम पाऊस किंवा गडगडाटी वाऱ्यांशी संबंधित पावसाच्या सरी (40-50 कि.मी. ताशी) अंतर्गत कर्नाटकातील उर्वरित जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी पडण्याची शक्यता आहे.

दिवस 2 (22 जून 2024) -किनारपट्टीच्या कर्नाटकातील जिल्ह्यांमध्ये अत्यंत मुसळधार पाऊस अथवा मेघगर्जनेसह विखुरलेला मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस शक्य. दक्षिण अंतर्गत कर्नाटकातील शिमोगा, चिक्कमंगळूरू, कोडगु जिल्ह्यांमध्ये सोसाट्याचा वारा (30-40 कि.मी. प्रतितास) संबंधित मुसळधार ते अति मुसळधार किंवा मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तर अंतर्गत कर्नाटकातील हावेरी, धारवाड, बेळगाव जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांशी संबंधित (30-40 कि.मी. प्रतितास) पृथक् मुसळधार किंवा गडगडाटी पाऊस पडण्याची शक्यता आहे. हलका ते मध्यम पाऊस/गडगडाटी वाऱ्यांशी संबंधित सरी (30-40 कि.मी. ताशी) दक्षिण अंतर्गत कर्नाटकातील उर्वरित जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी आणि उत्तर अंतर्गत कर्नाटकातील उर्वरित जिल्ह्यांमध्ये कांही ठिकाणी होण्याची शक्यता आहे.

दिवस 3 (23जून 2024) -किनारपट्टीच्या कर्नाटकातील जिल्ह्यांमध्ये विखुरलेला जोरदार मुसळधार आणि अत्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. दक्षिण अंतर्गत कर्नाटकातील शिमोगा, कोडगु, चिक्कमंगळूरू, हासन, दावणगेरे आणि म्हैसूर जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांशी संबंधित (30-40 कि.मी. प्रतितास) विखुरलेला जोरदार मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तर अंतर्गत कर्नाटकातील हावेरी, धारवाड जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह (30-40 कि.मी. प्रतितास) विखुरलेला जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. वादळी वाऱ्यांशी संबंधित हलका ते मध्यम पाऊस (30-40 कि.मी. प्रतितास) अंतर्गत कर्नाटकातील उर्वरित जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी होण्याची शक्यता आहे.

दिवस 4 (24 जून 2024) -किनारपट्टीच्या कर्नाटकातील जिल्ह्यांमध्ये विलग मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. दक्षिण अंतर्गत कर्नाटकातील कोडगु, चिक्कमंगळूरू, शिमोगा, हासन, दावणगेरे, चित्रदुर्ग जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह (30-40 कि.मी. प्रतितास) विखुरलेला जोरदार ते खूप मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तर अंतर्गत कर्नाटकातील हावेरी, धारवाड, बेळगाव जिल्ह्यांमध्ये सोसाट्याचा वाऱ्याशी (30-40 कि.मी. प्रतितास) निगडीत मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. वादळी वाऱ्यांशी संबंधित हलका ते मध्यम पाऊस (30-40 कि.मी. प्रतितास) अंतर्गत कर्नाटकातील उर्वरित जिल्ह्यांमध्ये बहुतेक ठिकाणी होण्याची शक्यता आहे.Rain Evening

दिवस 5 (25 जून 2024) -किनारपट्टीच्या कर्नाटकातील जिल्ह्यांमध्ये विलग मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. दक्षिण अंतर्गत कर्नाटकातील कोडगु, चिक्कमंगळूरू, शिमोगगा, दावणगेरे जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह (30-40 कि.मी. प्रतितास) विखुरलेला मुसळधार ते खूप जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तर अंतर्गत कर्नाटकातील धारवाड, गदग आणि हावेरी जिल्ह्यांमध्ये सोसाट्याचा वारा (30-40 कि.मी. प्रतितास) संबंधित मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. वादळी वाऱ्यांशी संबंधित हलका ते मध्यम पाऊस (30-40 कि.मी. प्रतितास) अंतर्गत कर्नाटकातील उर्वरित जिल्ह्यांमध्ये बहुतेक ठिकाणी होण्याची शक्यता आहे.

दिवस 6 (26 जून 2024) -कर्नाटक राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये बहुतांश ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. दिवस 7 (27 जून 2024) -कर्नाटक राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये बहुतांश ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. डॉ. राजवेल मणिकम (शास्त्रज्ञ ‘ई’ आणि हेड एलएसीडी हवामान केंद्र, बेंगळुरू) यांच्या स्वाक्षरीने पर्जन्यवृष्टीचा हा अंदाज जारी करण्यात आला आहे.

उत्तर अंतरिक कर्नाटकमध्ये ‘ऑरेंज अलर्ट’ जारी

उत्तर अंतरिक कर्नाटकमध्ये उद्या शनिवार दि. 22 ते सोमवार दि. 24 जून 2024 या कालावधीत मुसळधार किंवा अतीमुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. सदर कालावधीत 64.5 ते 115.5 मि.मी. पासून 115.5 ते 204.4 मि.मी. पर्यंत पाऊस होण्याची शक्यता असल्यामुळे संपूर्ण उत्तर अंतरिक कर्नाटक मध्ये ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.

 

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.