बेळगाव लाईव्ह :प्रवाशांची गर्दी कमी करण्यासाठी नैऋत्य रेल्वेने सर एम. विश्वेश्वरय्या टर्मिनल बंगळूर आणि पंढरपूर दरम्यान विशेष रेल्वे गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला असून त्यानुसार ही विशेष रेल्वे सेवा सुरू झाली आहे.
रेल्वे क्र. 06501 बेंगलोर येथून उद्या 29 जून रोजी सायंकाळी 5:30 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 11:35 वाजता पंढरपूर येथे पोहोचेल. रेल्वे क्र. 06502 पंढरपूरहुन 30 जूनला सायंकाळी 6:30 वाजता प्रस्थान करेल आणि बेंगलोर येथे दुसऱ्या दिवशी 11:30 वाजता पोहोचेल.
रेल्वे क्र. 06503 बेंगलोर येथून 28 रोजी सायंकाळी 5:30 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 11:35 वाजता पंढरपूरला पोहोचेल. रेल्वे क्र. 06504 पंढरपूर येथून 29 जून रोजी सायंकाळी 6:30 वाजता निघून बेंगळूर येथे दुसऱ्या दिवशी 11:30 वाजता पोहोचेल.
रेल्वे क्र. 06505 बेंगळूर येथून 30 जूनला रात्री 10 वाजता निघून दुसऱ्या दिवशी सायंकाळी 4:30 वाजता पंढरपूरला पोहोचणार आहे. रेल्वे क्र. 06506 पंढरपूर येथून 1 जुलै रोजी सायंकाळी 6:30 वाजता निघून बेंगलोर येथे दुसऱ्या दिवशी 11:30 वाजता पोहोचणार आहे.
सदर विशेष रेल्वे गाड्या तुमकुर, बनसंद्रा, अर्सिकेरे, बिरूर, चिक्कजाजूर, दावणगिरी, हरिहर, राणेबेन्नूर, हावेरी, हुबळी, धारवाड, लोंढा, खानापूर, बेळगाव, गोकाक, घटप्रभा, रायबाग, चिंचली, उगार खुर्द आणि मिरज येथे येता -जाता थांबा घेतील.
प्रवाशांनी या विशेष रेल्वे सेवेचा लाभ घ्यावा. तसेच अधिक माहितीसाठी हेल्पलाइन क्र. 139 वर संपर्क साधावा किंवा www.enquiry.indianrail.gov.in. या वेबसाईटला भेट द्यावी, असे आवाहन नैऋत्य रेल्वेने केले आहे