बेळगाव लाईव्ह :नीट आणि नेट पेपर फुटी प्रकरणी नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या महासंचालक पदी नियुक्ती झालेले प्रदीप सिंग खरोला यांनी बेळगावात दोन वर्षे जिल्हाधिकारी म्हणून सेवा बजावली आहे.
प्रदीप सिंग खरोला हे निवृत्त आयएएस अधिकारी असून ते 13 फेब्रुवारी 1995 ते 19 जून 1997 यादरम्यान बेळगावचे जिल्हाधिकारी होते. खरोला हे आयएएस अधिकारी म्हणून निवृत्ती झाल्यानंतर इंडिया ट्रेड प्रमोशन ऑर्गनायझेशन वर व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत होते.
त्यांनी आतापर्यंत विविध ठिकाणी आणि विविध संस्थांमध्ये महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. आता संपूर्ण देशाला आग्रहण टाकणाऱ्या नीट आणि नेट पेपर फुटी करणे नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या महासंचालक पदी त्यांची नियुक्ती झाली आहे. त्यांच्या या नियुक्तीमुळे त्यांनी बेळगावत बजावलेल्या सेवेला पुन्हा उजाळा मिळाला आहे.प्रदीप सिंग खरोला या अगोदर एअर इंडियाचे एमडी देखील होते.
बेळगावातून जिल्हाधिकारी किंवा पोलीस अधीक्षक किंवा प्रशासनातील कोणत्याही मोठे वरिष्ठ पद भूषवलेले अधिकाऱ्यांनी देश पातळीवर देखील मोठमोठी पदे बजावलेली आहेत.
बेळगावच्या पोलीस प्रमुख पदी राहिलेल्या सोनिया नारायण नारंग दिल्लीत केंद्रीय गुप्तचर विभागात, तत्कालीन जिल्हाधिकारी अतुल कुमार तिवारी यांनी देखील केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयात, राजेंद्र कटारिया यांनी रेल्वे मंत्रालयात तर त्याआधी रेणुका चिदंबरम यासह अनेक अधिकाऱ्यांनी बेळगाव पद्मभूषण दिल्लीत केंद्रस्तरावर देखील मोठी पदे भूषवलेली आहेत.