बेळगाव लाईव्ह : सालाबादप्रमाणे यंदाही मुतगा या गावातील श्री भावकेश्वरी यात्रा उत्साहात साजरी करण्याचा निर्णय मुतगा ग्रामपंचायत देवस्थान कमिटी व पंचमंडळींनी एकमताने संमत केला आहे.
देवस्थान कमिटीचे प्रमुख हेमंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून यात्रा यशस्वी करण्यासाठी पारंपारिक नियमांचे पालन करण्याचा निर्धार करण्यात आला.
यात्रेच्या पार्श्वभूमीवर २८ जून, ५ जुलै, ९ जुलै, १२ जुलै आणि १६ जुलै असे पाच वार पाळण्यात येणार आहेत. मंगळवार दि. १६ जुलै रोजी ग्रामस्थांच्या वतीने देवीची ओटी भरण्यात येईल.
त्यानंतर पारंपारिक पद्धतीने शुक्रवार दिनांक २६ जुलै रोजी श्री भावकेश्वरी देवी यात्रोत्सवाला प्रारंभ होणार आहे. तर शनिवार दि. २७ जुलै या यात्रेची सांगता होणार आहे, असे कळविण्यात आले आहे.
या बैठकीला देवस्थान कमिटीचे सदस्य उमेश पुरी, भाऊ पाटील, शामराव पाटील, परशराम पाटील ,भैरू पाटील, सुरेश पाटील, सचिन पाटील, बाळू बिरादार ,कृष्णा पाटील, देवस्थान कमिटीचे सदस्य व पदाधिकारी तसेच पंचमंडळी, ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते,