बेळगाव लाईव्ह :वाढदिवसाला बोलावून मित्राचा निर्घृण खून करण्यात आल्याची घटना मंगळवारी रात्री येरगट्टी तालुक्यातील मुग्गानट्टी गावात घडली आहे.
खून झालेल्या दुर्दैवी युवकाचे नांव बसवराज गुरुलिंगप्पा मुद्द्न्नवर (वय 23 रा. मुग्गानट्टी) असे आहे.
वाढदिवसासाठी आलेल्या बसवराज याच्याशी झालेल्या भांडणाचे पर्यवसान चार-पाच जणांकडून त्याचा खून करण्यामध्ये झाल्याचे कळते.
समाजसेवक असलेला बसवराज हा अनाथ मुले आणि असाहाय्य व्यक्तींच्या मदतीला नेहमी धावून जात होता असे दुःखाचा डोंगर कोसळलेल्या त्याच्या आईने साश्रूनयनाने सांगितले.
याप्रकरणी मुरगोड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.