बेळगाव लाईव्ह : लोकसभा निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया पूर्ण झाली असून चिक्कोडी मतदार संघातून प्रियांका सतीश जारकीहोळी यांनी प्रस्थापितांविरोधात लढत देऊन ९०८३४ मतांची आघाडी घेत विजय साधला आहे.
७१३४६१ मते मिळवून चिक्कोडीचे दोन वेळा खासदारपद भूषविलेले अण्णासाहेब जोल्ले यांचा पराभव झाला असून जोल्ले कुटुंबियांचे वर्चस्व असणाऱ्या निपाणी विधानसभा मतदार संघातूनच मतदारांनी जाल्लेंकडे पाठ फिरविल्याचे चित्र समोर आले आहे.
मतदारसंघनिहाय मतमोजणीची आकडेवारी खालील प्रमाणे आहे :-
हुक्केरी : भाजपा : ८५२२६, काँग्रेस : ७७६४३
निप्पाणी : भाजप : ७६२९८ काँग्रेस : १०६०५०
चिक्कोडी : भाजपा : ८०५६९ काँग्रेस : ९७१५९
रायबाग : भाजप : ७३००२ काँग्रेस : ७९८२१
यमकनमर्डी : भाजप : ७१९५५ काँग्रेस : ९५५४२
कुडची : भाजपा : ६११७४ काँग्रेस : ८३९४२
कागवाड : भाजप : ७२८७७ काँग्रेस : ८४०७५
मतदासंघ*काँग्रस* भाजप* मताधिक्य*
निपाणी 106050* 76298* 29752(काँग्रेस)
चिकोडी*97159*80569*16590 (काँग्रेस)
रायबाग*79821*73002*6819 (काँग्रेस)
हुक्केरी*77643*85226*7583(भा जप)
यमकनमर्डी*95542*71955*23587(काँग्रेस )
कुडची*83942*61174*22768 (काँग्रेस)
कागवाड*84075*72877*11198 (काँग्रेस)
अथणी*87376*96041*8665(भाजप)
प्रियांका जारकीहोळी यांना चिक्कोडी मतदार संघात झालेल्या एकूण मतदानापैकी ५१.२१ टक्के मते मिळाली आहेत तर भाजपचे अण्णासाहेब जोल्ले यांना ४४.६९ टक्के मते मिळाली आहेत तर उरवीरत १.८३ टक्के मते हि कल्लोळीकर शंभू कृष्णा या उमेदवाराला मिळाली आहेत. या मतदार संघात २६०८ मतदारांनी नोटा पर्याय निवडला आहे. तर ७३६८ मतदारांनी पोस्टल द्वारे मतदानाचा हक्क बजावला आहे.