Sunday, November 3, 2024

/

काँग्रेसचा पराभव विनयपूर्वक मान्य -मंत्री हेब्बाळकर

 belgaum

बेळगाव लाईव्ह:बेळगाव लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचा पराभव मी विनयपूर्वक स्वीकारत आहे, असे महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितले.

बेंगलोर मुक्कामी उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांची भेट घेतल्यानंतर त्या प्रसिद्धी माध्यमांशी बोलत होत्या. बेळगाव लोकसभा मतदार संघाचा निकाल पाहता भाजप आणि एमईएस (म. ए. समिती) यांनी एकमेकांशी हात मिळवणी केल्याचे दिसते.

गेल्या 25 वर्षापासून बेळगावमध्ये काँग्रेस, भाजप आणि एमईएस अशी तिरंगी स्पर्धा होत आहे. तथापि यावेळी तसे घडले नाही, आमच्या पराभवाला अनेक कारणे आहेत. विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीचे वातावरण हे सर्वस्वी भिन्न असते. निवडणुकीच्या गणिताबद्दल बोलायचे झाल्यास प्रत्येक मतदारसंघासाठी वेगवेगळ्या दृष्टिकोन असतो.

बेळगाव मतदारसंघात काँग्रेसला पराभव पत्करावा लागला असला तरी सुरुवातीला काँग्रेससाठी उत्तम वातावरण होते. जनतेतून पाठिंबाही व्यक्त होत होता. मात्र तरीही निकालाने आम्हाला हात दिला असे मंत्री हेब्बाळकर यांनी पुढे सांगितले. काँग्रेसच्या पराभवासंदर्भात हाय कमांड परामर्ष समिती स्थापन करणार असल्याच्या बातमीबद्दल मला काही माहित नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.

कर्नाटकात निवडणुकीचा निकाल काहीही लागला असला तरी कोणत्याही कारणास्तव गॅरंटी योजना बंद करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही जनतेच्या सबलीकरणासाठी गॅरंटी योजना सुरू करण्यात आल्या आहेत निस्वार्थपणे आमचे सरकार गॅरेंटी योजना राबवत आहे, अशी माहिती मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली.

बेळगावातील काँग्रेस नेत्यांनी नुकतीच मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यावेळी बेळगाव मतदार संघातील काँग्रेसच्या पराभवाबद्दल मुख्यमंत्री ‘सॉरी’ म्हणाले, हा त्यांचा मोठेपणा आहे, असे त्यांनी सांगितले. याप्रसंगी मंत्र्यांचे बंधू विधानपरिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.