बेळगाव लाईव्ह : बेळगाव प्रमाणेच कारवार लोकसभेचा बालेकिल्ला देखील भाजपने अबाधित राखत कारवार लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीत भाजपचे विश्वेश्वर हेगडे -कागेरी विजयी झाले आहेत.
हेगडेंनी काँग्रेस डॉ. अंजली निंबाळकर यांना 3 लाख 37 हजार ४२८ मतांनी पराभूत केले आहे. विश्वेश्वर हेगडे कागेरी यांनी ७८२४९५ मते घेत ३३७४२८ मतांची आघाडी राखत विजय मिळविला आहे. तर काँग्रेसच्या अंजली निंबाळकर या ४४५०६७ मतांसह पराभूत झाल्या आहेत.
मागील विधानसभा निवडणुकीत भाजप आणि काँग्रेसच्या दोन्ही उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला होता मात्र आता कागेरी हेगडे यांनी या निवडणुकीत विजय मिळवला आहे.
या लोकसभा निवडणुकीत भाजपचा कारवार बालेकिल्ला अबाधित राखणाऱ्या विश्वेश्वर हेगडे -कागेरी यांना 660979 मते, तर काँग्रेसच्या उमेदवार डॉ. अंजलीताई निंबाळकर यांना 366426 मते मिळाली. या दोघांसह कारवार लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी एकूण 13 जण रिंगणात होते.
या सर्वांना मिळालेल्या एकूण मतांची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. 1) विश्वेश्वर हेगडे -कागेरी : 660979, 2) डॉ. अंजली निंबाळकर : 366426, 3) गणपती हेगडे : 4472, 4) विनायक नाईक : 1261, 5) प्रजैक्य सुनील : 1561, 6) अरविंद गौडा : 904, 7) अविनाश नारायण पाटील : 773, 8) कृष्णा बळीगेर : 920,
9) के. पी. पाटील : 956, 10) चिदानंद हनुमंतप्पा हरिजन : 1721, 11) नागराज अनंत शिराली :2882 , 12) निरंजन उदयसिंग सरदेसाई : 4169, 13) राजशेखर शंकर हिंडलगी : 5397, नोटा : 10176. एकूण मतमोजणी : 10,57,072.