बेळगाव लाईव्ह :बेळगाव शहर परिसरातील फूटपाथ अर्थात पदपथावर बेकायदा वाहन चालवणाऱ्या आणि पार्क करणाऱ्यांवर मोटार वाहन कायद्यान्वये कारवाई केली जात आहे. जनतेने सर्व फूटपाथ खुले ठेवावेत आणि वाहतुकीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
नियम उल्लंघनांचे पुढील तरतुदींनुसार निराकरण केले जाईल. 1)कर्नाटक पोलीस कायदा-1963 से. 92(जी) : कोणत्याही फुटपाथवर वाहन सोडून जाण्यास किंवा चालविण्यास अथवा तेथे कोणतेही वाहन ओढून नेण्यास किंवा ढकलण्यास मनाई करते.
2) भारतीय दंड संहिता कलम 283 : सार्वजनिक मार्ग किंवा ठिकाणी अडथळा आणून जनतेला धोका निर्माण करणाऱ्या कोणालाही दंड करते.
3) फूटपाथवर बेकायदेशीरपणे वाहन चालवणे किंवा पार्किंग करणे : उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल.
तेंव्हा पादचाऱ्यांच्या सुरक्षेच्या हितासाठी सर्व वाहनचालक आणि व्यापाऱ्यांना विनंती करण्यात येते की, त्यांनी फूटपाथवर अडथळा निर्माण करणे टाळावे आणि वाहतूक नियमांचे पालन करावे, असे आवाहन पोलीस प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.