Friday, June 28, 2024

/

भाजपच्या माजी आमदाराने घेतली रेल्वे राज्यमंत्र्यांकडे मागणी

 belgaum

 

 

 

 belgaum

 

बेळगाव लाईव्ह : गेल्या दोन वर्षापासून बेळगावच्या रेल्वे स्थानकावर छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे तेल चित्र बसवण्याची मागणी करत अनेक आंदोलने झाली तरी देखील केंद्र सरकारने याची दखल घेतली नाही. अखेर बेळगाव भाजपच्या माजी आमदाराने यासाठी पुढाकार घेतला असून थेट रेल्वे राज्यमंत्र्यांकडेच याची मागणी केली आहे.

बेळगांव रेल्वे स्टेशनमध्ये छत्रपती श्री शिवाजी महाराजांची मुर्ती व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा बसविण्यासाठी रेल्वे मंत्री व्ही सोमान्ना यांची भेट घेत मागणी केली.

या संदर्भात बोलताना अनिल बेनके म्हणाले की, बेळगांव रेल्वे स्टेशनमध्ये छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या मुर्ती व डॉ. बाबासाहेब अंबेडकरांच्या मुर्ती बसविण्याची मागणी सातत्याने होत आहे. बेळगांव हे पारंपारिक शहर मानले जात असल्याने जिल्ह्यात मोठ्या संख्येने शिवभक्तांचे वास्तव्य आहे आणि छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्याशी भावनिक ओढ आहे.

तसेच संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बेळगांवला भेट दिली होती. मराठा लाईट इन्फ्रंट्री रेजिमेंटल सेंटर कॅन्टोन्मेंट कॅम्प परिसरात आहे. तसेच बेळगांवचे रेल्वे स्टेशन देखील कॅन्टोन्मेंट कॅम्प परिसरात आहे. दोन्ही मुर्त्यां बसविण्यासाठी विविध संघटना सातत्याने आंदोलने करत आहेत.दोन्ही प्रतिमा आंदोलन करून रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्वाराच्या आत तात्पुरत्या बसवण्यात आल्या आहेत या प्रतिमा कायम स्वरुपी न बसवल्याने समाजात चुकीच्या पद्धतीने संदेश व अफवा पसरविल्या जात आहेत.Railway station

त्यामुळे या प्रकरणाचा गांभीर्याने विचार करावा आणि बेळगांव रेल्वे स्टेशनमध्ये छत्रपती श्री शिवाजी महाराजांची मुर्ती व डॉ. बाबासाहेब अंबेडकरांची मुर्ती तातडीने बसविण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना द्यावेत अशी मागणी अनिल बेनके यांनी रेल्वे मंत्रालयाचे
राज्यमंत्री व्ही. सोमन्ना यांना विनंती केली आहे.

बेळगाव रेल्वे स्थानकावर छत्रपती शिवरायांचे आणि घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे तैलचित्र बसवण्यासाठी श्रीराम सेना हिंदुस्थान महाराष्ट्र एकीकरण समिती आणि दलित संघटनासह अनेक संघटनांना आंदोलन करावे लागले होते त्यानंतर प्रवेश द्वारावर तात्पुरत्या या प्रतिमांची स्थापना करण्यात आली आहे अशा परिस्थितीत या थोर पुरुषांच्या मूर्ती कायमस्वरूपी प्रस्थापित करण्याची मागणी वाढू लागली आहे.

भाजपचे माजी आमदार बेनके यांच्या मागणीनंतर आता रेल्वे राज्यमंत्री या समस्या साठी पुढाकार घेतील का? याकडे शिवभक्तांचे लक्ष लागून राहिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.