Sunday, November 24, 2024

/

मंगळवारी बेळगावमध्ये मतमोजणी : वाहतूक व्यवस्थेबाबत महत्त्वाची सूचना

 belgaum

बेळगाव लाईव्ह :बेळगाव शहरातील आरपीडी महाविद्यालयामध्ये उद्या मंगळवारी लोकसभा निवडणुकीची मतमोजणी होणार आहे. मतमोजणीसाठी येणारे अधिकारी, कर्मचारी, उमेदवार एजंट आणि प्रसिद्धी माध्यमांचे प्रतिनिधी यांच्या वाहनांसह सार्वजनिकांच्या वाहनांच्या पार्किंगसाठी खालील प्रमाणे व्यवस्था करण्यात आली आहे.

1) मतमोजणीसाठी येणारे अधिकारी कर्मचारी आणि प्रसिद्धी माध्यमांचे प्रतिनिधी : भाग्यनगर दुसऱ्या क्रॉस वरून लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटी जवळ डाव्या बाजूने वळून आमराई प्रवेशद्वारातून आरपीडी कॉलेज मैदानात वाहने पार्क करण्याची सोय करण्यात आली आहे.

2) उमेदवारांसाठी : आरपीडी पहिल्या गेटातून प्रवेश करून आपली वाहने केएलएस इंग्रजी माध्यम शाळेच्या मैदानावर पार्क करावीत. 3) एजंटांसाठी : एजंटांनी आपली वाहने हिंदवाडीतील गोमटेश हायस्कूल मैदानावर पार्क करून तेथून चालत मतमोजणी केंद्रावर यायचे आहे.

4) सार्वजनिकांसाठी : मतमोजणीसाठी वेगवेगळ्या तालुक्यातून येणाऱ्या नागरिकांपैकी गोकाक, अरभावी हुक्केरी, अथणी कागवाड, यमकणमर्डी भागातून येणाऱ्या नागरिकांनी लेले मैदान आणि व्हॅक्सिन डेपो मैदानावर आपली वाहने पार्क करावीत. बैलहोंगल, रामदुर्ग, कित्तूर, सौंदत्ती -यल्लमा भागातून येणाऱ्या नागरिकांनी नवा पी. बी. रोड, नाथ पै सर्कल मार्गे वडगाव प्रदेश ग्रामीण पोलीस ठाण्याच्या डाव्या बाजूला आदर्शनगर येथील शाळेचे मैदान आणि आदर्शनगर रस्त्याशेजारी आपली वाहने पार्क करावीत.

बेळगाव उत्तर बेळगाव दक्षिण आणि बेळगाव ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांनी आपली वाहने तिसऱ्या रेल्वे गेटकडून पिरनवाडीकडे जाणाऱ्या रस्त्याशेजारी दुतर्फा एका ओळीत रांगेने पार्क करावीत. टिळकवाडी प्रदेशात रेल्वे संचार असल्यामुळे पहिले आणि दुसरे रेल्वे गेट वारंवार बंद होत असते. त्यामुळे उद्या मतमोजणी दिवशी या रस्त्यावर वाहतूक कोंडी होऊ शकते. त्यासाठी मत मतमोजणी केंद्राच्या ठिकाणी येणाऱ्यांनी पर्यायी मार्ग अवलंबावा.

5) वाहतूक वळवलेली ठिकाणे (डायव्हर्शन) : गोवावेस, आरपीडी रोड, गुरुदेव मंदिर रोड, रानडे रोड, पहिल्या व दुसऱ्या रेल्वे गेट कडील रस्ता, अनगोळ रोड आणि भाग्यनगर रोड. या रस्त्यांवर उद्या वाहतुकीचा ताण वाढणार असल्यामुळे सकाळी 7 वाजल्यापासून मतमोजणी समाप्त होईपर्यंत सार्वजनिकांनी उपरोक्त रस्त्यांचा वापर टाळावा.Dc counting

गोवावेसहून आरपीडी सर्कलकडे जाणारी वाहने महावीर भवन जवळ वळविण्यात येणार आहेत. गुरुदेव रानडे रोड ,भगतसिंग गार्डन मार्गे आदर्शनगर वडगाव ग्रामीण पोलीस ठाण्याहून भाग्यनगर दहाव्या क्रॉस मार्गे अनुभव हरी मंदिरकडे वळविण्यात येणार आहेत. तिसऱ्या रेल्वे गेट पासून गोवावेस सर्कलकडे जाणारी वाहतूक अनगोळ क्रॉस इंडियन ऑइल पेट्रोल पंप मार्गे दुसऱ्या रेल्वे गेटवरून काँग्रेस रोडवर वळविण्यात येणार आहे. शहापूरहून येणारी वाहतूक गोवावेस सर्कल पासून उजव्या बाजूला वळवून महात्मा फुले रोड, कपलेश्वर उड्डाणपूल, शनी मंदिर मार्गे जुन्या पी. बी. रोडवर वळविण्यात येणार आहे.

6) नो पार्किंग : सुरळीत वाहतुकीसाठी गोवावेस सर्कलपासून अनगोळ क्रॉसपर्यंतच्या खानापूर रोडवर रस्त्याच्या दुतर्फा वाहने पार्क करण्यावर निर्बंध असणार आहे. 7) मतमोजणी केंद्रावर येणारे अधिकारी, कर्मचारी आणि एजंट आणि आपल्या सोबत मोबाईल, पानमसाला, गुटखा, शाईचे पेन, कॅमेरा, माचिस, लाइटर, प्लास्टिकच्या वस्तू किंवा इतर प्रतिबंधित वस्तू सोबत आणण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.