बेळगाव लाईव्ह : कर्नाटक सीमाभाग विकास प्राधिकरणाचे शिष्टमंडळ सांगली जिल्ह्यातील जत आणि सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट या तालुक्यांतील कन्नड कार्यकर्त्यांसह महाराष्ट्राच्या सीमावर्ती तालुक्यांतील आमदारांना भेटणार आहे.
आमदार सावंत यांच्यासोबत अक्कलकोटचे भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी हेही या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.
महाराष्ट्र सरकारने ११ कन्नड शाळांमध्ये १५ शिक्षकांची नियुक्ती केली आहे. जतचे आमदार विक्रमसिंह सावंत यांनी काही दिवसांपूर्वी पहिल्यांदाच हा मुद्दा उपस्थित केला होता.
ज्या विद्यार्थ्यांची मातृभाषा कन्नड आहे, अशा परिस्थितीत मराठी भाषिक शिक्षकांची नियुक्ती केल्यास ते शिक्षणापासून वंचित राहतील, असे त्यांनी सांगितले होते.
कन्नड शाळेतील बिगर कन्नड शिक्षकांची नियुक्ती चुकीची आहे. भाषेच्या आधारावर राज्याच्या स्थापनेवेळी मंजूर केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे हे उल्लंघन आहे.
आम्ही कर्नाटकमध्ये भाषिक अल्पसंख्याकासाठी शाळा देखील चालवत आहोत, अशी माहिती कर्नाटक सीमाभाग विकास प्राधिकरणाचे सचिव प्रकाश मथिहळ्ळी यांनी दिली.