बेळगाव लाईव्ह :मुस्लिम बांधवांचा बकरी ईद सणानिमित्त जिल्हा प्रशासनाने रविवार दिनांक 16 संध्याकाळी सहा वाजल्यापासून मंगळवार दिनांक 18 सकाळी सहा वाजेपर्यंत दारू विक्री बंद करण्याचा आदेश बजावला आहे.
बकरी ईद सणाच्या काळात कोणत्याही प्रकारे कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये यासाठी जिल्हा प्रशासनाने खबरदारी घेतली असून या काळात दारू विक्रीवर बंदी आणली आहे.
त्यामुळे या आदेशाचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी नितेश पाटील यांनी दिला आहे.