बेळगाव लाईव्ह: कुत्रा चावल्यास उपचारासाठी ५ हजार रुपये आणि कुत्रा चावल्याने मृत्यू झाल्यास मृताच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी, असा आदेश राज्य सरकारने २०२३ मध्ये काढला असला तरी बेळगाव जिल्ह्यातील कोणत्याही महापालिका नगर परिषद, नगरपालिका आणि नगर पंचायती पैकी अद्याप कुणीही नुकसान भरपाई दिली नाही.
बेळगाव शहरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे, शेकडो लोकांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतला आहे, मात्र अद्याप एकाही व्यक्तीला 5 हजार रुपयांची भरपाई मिळालेली नाही.
शासनाने 2023 मध्ये नुकसान भरपाई देण्याचे आदेश जारी केले असून वर्षभरापूर्वी काढलेल्या शासन आदेशाची अंमलबजावणी झाली नाही त्यामुळे देवाने वरदान दिले असले तरी पुजाऱ्याने दिलेले नाही अशीच स्थिती आहे.
राज्य सरकार केवळ आदेश काढते मात्र आदेशाची अंमलबजावणी करण्यास पुढे येत नाही कुत्र्याने चावा घेतल्यास उपचारासाठी पाच हजार रुपये चा आदेश जरी असला तरी प्रत्यक्षात अंमलबजावणी झालेली नसल्याने या आदेशाला केराची टोपली आहे का हाच महत्त्वाचा प्रश्न आहे.