बेळगाव लाईव्ह :यंदा नव्या रेडिरेकनरनुसार घरपट्टी आकारण्यात येत आहे. त्यामुळे घरपट्टीत तीन ते पाच टक्क्यांची वाढ झाली आहे. त्यातच एप्रिल महिन्यात देण्यात येणारी पाच टक्के सवलत यंदा ऑनलाईन बिघाडामुळे लोकांना घेता आली नाही. त्यामुळे लोकांच्या मागणीची दखल घेत अखेर महापालिकेने ३१ जुलैपर्यंत चालू घरपट्टीत पाच टक्के सवलत जारी केली आहे.
महापालिकेने यंदा ७० कोटी रुपयांची घरपट्टी वसूल करण्याचे टार्गेट ठेवले आहे. त्यापैकी आतापर्यंत ३० कोटी रुपयांची घरपट्टी वसूल करण्यात आली आहे. यंदा एप्रिल महिन्याच्या २० तारखेपर्यंत लोकांना ऑनलाईन घरपट्टी भरता आली नाही. ऑनलाईन प्रणालीत बिघाड झाल्यामुळे लोकांना चलनही देता आले नाही. त्यामुळे लोकांना इच्छा असूनही पाच टक्के सवलतीचा लाभ घेता आला नाही.
याशिवायनिवासी इमारतीतील घरपट्टीचाही प्रश्न कायम होता. त्यामुळे लोकांनी आणि माजी नगरसेवक संघटनेने महापालिका आयुक्त पी. एन. लोकेश यांना पाच टक्के सवलतीची मुदत वाढवून मिळावी, अशी मागणी केली होती. लोकांच्या मागणीनुसार महापालिकेने नगरविकास खात्याकडे सवलत वाढवून देण्याबाबत प्रस्ताव दिला होता. त्यावर अखेर निर्णय झाला असून महापालिका अखत्यारीतील मालमत्तांचा चालू वर्षातील कर भरण्यासाठी ३१ जुलैपर्यंत मुदत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे लोकांनी आपली घरपट्टी भरून पाच टक्के सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिका आयुक्त पी. एन. लोकेश यांनी केले आहे.
निवासी इमारतीतील घरपट्टीचाही प्रश्न कायम होता. त्यामुळे लोकांनी आणि माजी नगरसेवक संघटनेने महापालिका आयुक्त पी. एन. लोकेश यांना पाच टक्के सवलतीची मुदत वाढवून मिळावी, अशी मागणी केली होती. लोकांच्या मागणीनुसार महापालिकेने नगरविकास खात्याकडे सवलत वाढवून देण्याबाबत प्रस्ताव दिला होता. त्यावर अखेर निर्णय झाला असून महापालिका अखत्यारीतील मालमत्तांचा चालू वर्षातील कर भरण्यासाठी ३१ जुलैपर्यंत मुदत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे लोकांनी आपली घरपट्टी भरून पाच टक्के सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिका आयुक्त पी. एन. लोकेश यांनी केले आहे.
आधी भरलेल्यांना काय ?
सरकारच्या निर्णयानुसार महापालिकेने एप्रिल महिन्यापर्यंत चालू घरपट्टीवर पाच टक्के सवलत देण्यात आली होती. त्यानंतर मे आणि जून महिन्यात आतापर्यंत भरलेल्या घरपट्टीबाबत काय निर्णय घेणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे. त्यावर महापालिकेची भूमिका काय असणार, हे पाहावे लागणार आहे.