बेळगाव लाईव्ह : बेळगावच्या युवकांनी विविध क्षेत्रात नेहमीच आघाडी घेतलेली आहे त्यातच एक मानाचे पान अभिषेक जाधव यांच्या रूपाने शिरपेचात खोवले गेले आहे.
मूळचे केळकर बाग बेळगावचे रहिवाशी असलेले अभिषेक जाधव यांनी गेल्या वर्षभरात दिल्लीतील महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे विशेष अधिकारी म्हणून वेगळी छाप पाडली आहे . त्यांनी आपल्या वर्षभराच्या कारकीर्दीत दिल्लीत रखडलेले महाराष्ट्राच्या अनेक प्रोजेक्टवर यशस्वी रित्या काम केले आहे. नुकताच त्यांनी विविध देशांच्या राजदुतांची भेट घेतली होती.
महाराष्ट्रातील हापूस आंब्यासह आंब्यांच्या प्रसिद्धीसाठी, आंब्याच्या मुत्सद्देगिरीचा एक भाग म्हणून महाराष्ट्रच्या मुख्यमंत्र्यांचे नवी दिल्ली प्रतिनिधी मूळचे बेळगावचे अभिषेक जाधव यांनी नुकतीच विविध देशांच्या राजदूतांची दूतावासात जाऊन सदिच्छा भेट घेत त्यांना महाराष्ट्रातील आंबे भेट दिले.
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे नवी दिल्ली प्रतिनिधी असलेल्या अभिषेक जाधव यांनी जर्मनी, स्वीडन, ऑस्ट्रिया, ब्राझील, नॉर्वे, फीनलंड, इस्टोनिया, क्रोएशिया, चिली, टर्की, रवांडा, कझाकस्तान, जपान आणि डेन्मार्क या देशांच्या राजदूतांची दुतावासात जाऊन सदिच्छा भेट घेतली.
आपल्या देशातील सर्व परदेशी दुतावासांपर्यंत महाराष्ट्रातील आंबे पोहोचवून त्यांची जाहिरात, प्रसार (प्रमोशन) करणे हा या भेटीचा मूळ उद्देश होता. सदर भेटीप्रसंगी जाधव यांनी महामहीम राजदूतांना महाराष्ट्रातील आंबे भेटी दाखल दिले.
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे नवी दिल्ली प्रतिनिधी असलेले अभिषेक जाधव सध्या दिल्लीमध्ये वास्तव्यास असले तरी ते मूळचे केळकर बाग, बेळगाव येथील रहिवासी असून सामाजिक कार्यकर्ते दत्ता जाधव यांचा चिरंजीव आहेत.