Tuesday, January 21, 2025

/

चौघा साहसी मित्रांचा बेळगाव ते लडाख यशस्वी मोटरसायकल प्रवास

 belgaum

बेळगाव लाईव्ह :बेळगावच्या चार साहसी पर्यटनप्रेमी युवकांनी बेळगाव ते लडाख हा सुमारे 2800 कि.मी. अंतराचा मोटरसायकल प्रवास नुकताच यशस्वीरित्या पूर्ण केला आहे.

सुशांत संजय सांगुकर (रा. गोंधळी गल्ली बेळगाव), मृणाल मधुकर काकतकर रा. हिंडलगा बेळगाव), कौशिक शिवाजी भातकांडे (रा. भातकांडे गल्ली बेळगाव) आणि प्रियेश किरण लोहार
(रा. भातकांडे गल्ली बेळगाव) अशी या साहसी युवकांची नावे आहेत.Bgm to ladakh

सदर चौघा मित्रांनी आपल्या केए 22 ईझेड 1952, केए 22 एचएफ 6549 आणि केए 22 ईएक्स 9499 या क्रमांकाच्या मोटरसायकल वरून बेळगावपासून थेट लडाखपर्यंतचा सुमारे 2800 कि.मी.चा दीर्घ प्रवास यशस्वीरित्या पूर्ण करत लडाखच्या शिखरावर भगवा फडकवला.

सदर धाडसी मोहीम यशस्वी केल्याबद्दल सुशांत, मृणाल, कौशिक व प्रियेश या चौघांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.