बेळगाव लाईव्ह:लोकसभा निवडणुकीच्या आधी बदली झालेले बेळगाव महापालिका आयुक्त अशोक दूडगुंटी, उपायुक्त रेशमा तालीकोटी यांनी पुन्हा आपल्या अधिकार पदाची सूत्रे पूर्ववत हाती घेतली आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या आधी बेळगाव जिल्ह्यातील स्थानिक तसेच जिल्ह्यात तीन वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त काळ सेवा बजावलेल्या अधिकाऱ्यांची जिल्ह्याबाहेर बदली झाली होती.
त्या अनुषंगाने बेळगाव महापालिका आयुक्त अशोक दूडगुंटी यांची रायचूर अप्पर जिल्हाधिकारीपदी बदली करण्यात आली होती. आता लोकसभा निवडणूक आचारसंहिता समाप्त होताच सरकारने त्यांना पुन्हा बेळगाव महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्त केले आहे.
निवडणूक आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर अन्य अधिकाऱ्यांपेक्षा आयुक्त दूडगुंटी महापालिकेत पुन्हा रुजू होणार की नाही? याकडे पालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले होते. मात्र आता त्यांच्या पुनश्चनियुक्तीमुळे महापालिका प्रशासनामध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.
पालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांच्यासह महसूल उपायुक्त रेशमा तालिकोटी यांनी देखील गुरुवारी पदभार स्वीकारला आहे. लोकसभा निवडणूक झाल्यानंतर आता हळूहळू सर्वाधिकारी पुन्हा परतत आहेत.