बेळगाव लाईव्ह: ठाणे (महाराष्ट्र) शहरातील नव्या दमाचे व सतत वास्तववादी विषयावर रोखठोक व परखडपणे आपल्या लेखणीतून लेखन करणारे साहित्यिक अर्जुन जाधव यांच्या “प्रेयसी एक आठवण ..” या कादंबरीला जेष्ठ साहित्यिक प्रा. रसूल सोलापुरे बहुउदेशीय संस्था, महागाव (जि.कोल्हापूर) या संस्थेच्यावतीने उत्कृष्ट साहित्य निर्मितीचा यंदाचा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
जेष्ठ साहित्यिक प्रा. रसूल सोलापुरे बहुउदेशीय संस्था, महागाव (जि.कोल्हापूर) या संस्थेच्यावतीने दरवर्षी महाराष्ट्रातील साहित्यिकाच्या उत्कृष्ट साहित्य निर्मितीला राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार ” दिला जातो. या वर्षी साहित्यिक अर्जुन जाधव यांच्या “प्रेयसी एक आठवण ..
” या गाजत असलेल्या सत्य प्रेम स्वरूप कादंबरी उत्कृष्ट साहित्य निर्मितीसाठी ” राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार-2024″ जाहीर करण्यात आला आहे. ही गाजत असलेली व वाचकांच्या हृदयाला स्पर्श करणारी कादंबरी प्रा. डाॅ. संतोष राणे यांच्या शारदा प्रकाशन, ठाणे या नामवंत प्रकाशन संस्थेने प्रकाशित केलेली आहे.
या कादंबरीला पाच महिन्यात मिळालेला हा दहावा साहित्य पुरस्कार आहे. अर्जुन विष्णू जाधव यांच्या ” जागर, बेळगाव कुणाच्या बापाचं, बागलकोटची सुगंधा, माझा बाप उद्ध्वस्त गिरणी कामगार, लेक जगवा लेक शिकवा आणि व्यसनमुक्ती ” इत्यादी साहित्य संपदा प्रसिद्ध झालेली असून या साहित्य कलाकृतींना महाराष्ट्र शासनसह अनेक संस्था, संघटना, मंडळांचे पुरस्कार मिळाले आहेत.
आता अर्जुन जाधव यांची केंद्र सरकार व महाराष्ट्र सरकारच्या पंतप्रधान घरकुल योजनेचे कांही संरपच व ग्रामसेवकांनी संगमताने कसे तीन -तेरा केले आहेत,
यावर आधारित अभ्यासपुर्वक नव्या दमाची नवी कादंबरी “ग्रामपंचायत एक वाटणीदार अनेक..” नावानी लवकरच प्रकाशित होणार आहे.