बेळगाव लाईव्ह :लोकसभा निवडणुकीसाठी बेळगाव चिकोडी व कारभार लोकसभा मतदारसंघात येत्या मंगळवार दि. 7 मे रोजी मतदान होणार असून बेळगाव जिल्ह्यात मतदान प्रक्रिया शांततेत पार पडण्यासाठी आठवडी बाजार आणि यात्रांवर बंदी घालण्यात आली आहे.
बेळगाव जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी नितेश पाटील यांनी कलम 144 अंतर्गत ही बंदी घातली आहे.
त्यामुळे बेळगाव लोकसभा मतदारसंघात बेळगाव तालुक्यात 7 मे रोजी उचगाव येथील श्री मळेकरणी देवीचा कार्यक्रम होणार नाही.
त्याचप्रमाणे हुक्केरी, मुडलगी, गोकाक, बैलहोंगल, रामदुर्ग, निपाणी, अथणी, कुडची रायबाग, खानापूर, कित्तूर वगैरे तालुक्यातील विविध गावांमध्ये मंगळवारी 7 मे रोजी होणारा आठवडी बाजार व यात्रा रद्द करण्यात आल्या आहेत.