बेळगाव लाईव्ह:बेळगाव विमानतळावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येमध्ये एप्रिल महिन्यात 2.5 टक्के वाढ झाली आहे.
गेल्या एप्रिल महिन्यात 31,060 प्रवाशांनी बेळगाव विमानतळावरून प्रवास केल्याची नोंद भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडे झाली आहे.
गेल्या एप्रिल महिन्यात बेळगाव विमानतळावरून 508 विमान फेऱ्यांद्वारे 31 हजाराहून अधिक प्रवाशांनी प्रवास तर केलाच आहे, शिवाय 1.7 मॅट्रिक टन कार्गो वाहतूक झाली आहे.
बेळगाव विमानतळावरून बंगलोर, मुंबई, नवी दिल्ली, हैदराबाद, अहमदाबाद, नागपूर, जोधपूर, जयपूर आणि तिरुपती या देशातील 10 प्रमुख शहरांना विमान सेवा दिली जाते.
यापैकी बेळगाव -सुरत ही विमान फेरी येत्या जून महिन्यापासून रद्द करण्यात आली असली तरी इतर शहरांना प्रवाशांचा प्रतिसाद वाढत आहे.
गेल्या जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यात सदर विमानतळावरून 1,30,520 प्रवाशांनी प्रवास केला आहे. तसेच त्यासाठी 1594 विमान फेऱ्या झाल्याची नोंद आहे.