बेळगाव लाईव्ह:कंग्राळी खुर्द येथील श्री लक्ष्मी मंदिरातील देवीच्या मंगळसूत्रांसह इतर साहित्य चोरीला गेल्याची घटना आज शनिवारी सकाळी उघडकीस आली आहे.
सदर चोरीचा प्रकार काल मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास घडल्याचा कयास आहे. चोरट्याने श्री लक्ष्मी देवीची पाच मंगळसूत्र, एक चांदीचा किरीट व चांदीचा हळदी कुंकू करंडा लंपास केला आहे.
याबाबतची माहिती मिळताच एपीएमसी पोलीस आणि लागलीच घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. याप्रकरणी एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.
दरम्यान श्री लक्ष्मी मंदिरातील चोरीचा प्रकार परिसरात चर्चेचा विषय झाला आहे.