बेळगाव लाईव्ह: गल्ली क्रिकेटचे भांडण वाढत जाऊन विकोपाला गेल्याने दोन गटात हाणामारी झाली त्यानंतर झालेल्या दगडफेकी नंतर वातावरण तणावपूर्ण बनले आहे.
बेळगाव शहरातील शहापूर भागातील अळवण गल्लीत गुरुवारी सायंकाळी ही घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार गल्ली क्रिकेटमधील मुलांमध्ये झालेल्या भांडणातून दोन गटात हाणामारी झाली असून बेळगावातील शहापूर भागातील अळवण गल्ली येथे किरकोळ दगडफेकीची घटना घडली आहे.
या घटनेत दोघेजण जखमी झाले आहेत शहापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन बंदोबस्त वाढवला आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने देखील घटनास्थळी धाव घेतली असून परिस्थिती नियंत्रणाखाली आणि शांत आहे.