बेळगाव लाईव्ह:त्या दोघांचं लग्न निश्चित झालं होतं. परंतु अचानक तब्येत बिघडलेल्या मुलीच्या वैद्यकीय तपासणीत तिला कॅन्सर झाल्याचे निष्पन्न झाले.
आपल्याला कॅन्सर झाल्याचे समजताच त्या मुलीने आत्महत्या केली आणि ही बातमी कळताच धक्का बसलेल्या मुलाने देखील आपल्या घरी आत्महत्या केल्याची घटना बेळगाव शहरात घडली आहे.
कपड्यांच्या व्यापारासाठी दूर उत्तर प्रदेशातील फतेपुर येथून बेळगावमध्ये आलेला 27 वर्षीय आवेश जुबेर पठाण या युवकाने शहरातील चिरागनगर येथे राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली.
जिच्याशी आपला या पद्धतीने विवाह निश्चित झाला आहे त्या मुलीने फतेपुर येथे आत्महत्या केल्याची बातमी कळताच धक्का बसलेल्या अस्वस्थ, हैराण मुलाने बेळगावमध्ये आत्महत्या केली. सदर घटनेची खडेबाजार पोलीस ठाण्यात नोंद झाली असून अधिक तपास सुरू आहे.