Sunday, November 10, 2024

/

भटक्या कुत्र्यांच्या नसबंदी मोहिमेचा वेग वाढविण्याची मागणी

 belgaum

बेळगाव लाईव्ह :बेळगाव शहरातील भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांची समस्या निकालात काढण्यासाठी त्यांच्या वाढत्या संख्येला आळा घालण्यात यावा. कुत्र्यांना ठार न मारता महापालिकेने वैज्ञानिक पद्धतीने नियोजनबद्धरित्या वेगाने भटक्या कुत्र्यांच्या नसबंदीची मोहीम राबवावी, अशी मागणी ॲनिमल वेल्फेअर एनजीओस तसेच बेळगावचे पशु कार्यकर्ता आणि पशुप्रेमींनी केली आहे.

शहरातील कन्नड साहित्य भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ही मागणी करण्यात आली. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ता -बावा एनजीओ वरूण कारखानीस, डॉ. प्रवीण मटपत्ती, सामाजिक कार्यकर्त्या निकिता कुंटे, सौरभ सामंत वगैरे उपस्थित होते. यावेळी बोलताना डॉ, प्रवीण मठपती म्हणाले की, अलीकडे आपल्या शहरातील भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली आहे. शहराची वाढती लोकसंख्या हे याचे कारण आहे. लोकसंख्या वाढली की भटक्या कुत्र्यांची संख्या वाढते.

दुसरीकडे आपण आपल्या मुलांना प्राणी दयेचे महत्त्व समजावून देऊन त्यांना प्राण्यांची कसे वागावे हे शिकवले पाहिजे. कारण शहरातील लोकांचा भटक्या प्राण्यांशी जास्त संपर्क येत असतो. कुत्र्यांच्या बाबतीत बोलायचे झाल्यास त्यांना दगड मारू नये. कुत्रे अन्न खात असताना अथवा झोपलेले असताना त्याला त्रास देऊ नये. अशी कांही महत्त्वाची पथ्य पाळली तर कुत्री आपल्यावर हल्ला करत नाहीत. हे वगळता कुत्र्यांनी हल्ला करण्याची कारण म्हणजे रॅबीज हा रोग होय. या रोगामुळे कुत्री पिसाळतात.

अशा कुत्र्यांना पकडून रॅबीजची लागण झाल्याचे निश्चित करण्यासाठी संबंधित त्यांना दहा दिवस निरीक्षणाखाली ठेवावे लागते. भटक्या कुत्र्यांची वाढती संख्या नियंत्रणाखाली आणण्यासाठी त्यांची नसबंदी केली गेली पाहिजे. त्यासाठी महापालिकेने भटक्या कुत्र्यांची सध्याची समस्या गांभीर्याने घेऊन नियोजनबद्धरित्या वेगाने त्यांची नसबंदी मोहीम राबविली पाहिजे वैज्ञानिकरित्या कुत्र्यांच्या प्रजननाला आळा घातल्यास कुत्र्यांनी चावा घेण्याच्या घटना कमी होऊ शकतात असे स्पष्ट करून कुत्र्यांनी हल्ला करून लहान मुलं वगैरे कोणालाही इजा करू नये ही मागणी रास्त आहे.Varun

यावर उपाय म्हणजे ॲनिमल वेल्फेअर बोर्ड ऑफ इंडियाने (एडब्ल्यूबीआय) भटक्या कुत्र्यांच्या बाबतीत सुधारित मार्गदर्शक सूची जारी केली आहे. कुत्र्यांच्या हल्ल्यांसंदर्भात अनेकांनी उच्च व सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयाने त्यांना निर्देश दिले आहेत की त्यांनी एडब्ल्यूबीआयच्या मार्गदर्शक सूचीचे पालन करावे, असे डॉ. मटपत्ती यांनी सांगितले.

पशुप्रेमी सामाजिक कार्यकर्ता वरूण कारखानीस म्हणाला की, अलीकडच्या काळात बेळगाव शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली असून कुत्र्यांनी चावा घेण्याच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. त्यामुळे भटक्या कुत्र्यांना मारून टाकण्याची भाषा केली जात आहे. मात्र सोपा उपाय हा आहे की या कुत्र्यांच्या नसबंदीच्या मोहिमेचा वेग वाढविला गेला पाहिजे. महापालिकेने सध्या सुमारे 4000 कुत्र्यांची नसबंदी केली आहे याचे कारण त्यांच्याकडे कुत्र्यांसाठी असणारे निवाऱ्याचे ठिकाण लहान आहे. तसेच योग्य पथकही नाहीत याकरिता आमची महापालिकेला विनंती आहे की, कुत्र्यांच्या नसबंदीसाठी योग्य प्रकारे निधी उपलब्ध करून दिला जावा.

तसेच एक मोठे निवारा केंद्र उभारण्यात यावे. त्यामुळे एक -दोन वर्षात बेळगाव मध्ये असलेल्या सुमारे 20 हजार भटक्या कुत्र्यांची नसबंदी होऊन त्यांची संख्या कमी होईल. याखेरीज नसबंदीमुळे आक्रमक असलेले कुत्रे मवाळ शांत होत असल्याने कुत्र्यांच्या हल्ल्यांची प्रमुख समस्या निकालात निघेल. महापालिकेप्रमाणे जनतेची ही जबाबदारी आहे की त्यांनी घरातील शिल्लक अन्न फेकून देऊन वाया न घालवता भटक्या कुत्र्यांना खाऊ घालावे. ही कुत्री उपाशी असतात त्यांना अन्न पाणी दिल्यास महिन्या -दोन महिन्यात ती कुत्री मैत्रीपूर्ण वर्तन करू लागतात. परिणामी कुत्र्यांचा हल्ला त्यांनी चावा घेणे वगैरे सर्व काही बंद होऊन जाईल.

याव्यतिरिक्त शाळा महाविद्यालय आणि लोकांमध्ये जाऊन आपण कुत्र्यांशी कसं वागलं पाहिजे? यासंबंधी जनजागृती कार्यक्रमही राबविले गेले पाहिजेत. भटक्या कुत्र्यांवर दगडफेक करणे, त्यांना राॅडने मारणे, त्यांच्यावर ॲसिड फेकणे, कुत्र्यांना विष घालणे असे प्रकार थांबले पाहिजेत, असे स्पष्ट करून थोडक्यात आम्ही ज्या समाजात राहतो तेथे आम्ही प्राण्यांचीही मैत्रीपूर्ण राहिले पाहिजे असे वरूणने नमूद केले.

जखमी भटक्या कुत्र्यांवर स्वयंस्फूर्तीने उपचार करणारी सामाजिक कार्यकर्ता निकिता म्हणाली की, माणुसकीच्या दृष्टिकोनातून घरातील उरलेलं शिल्लक अन्न कचऱ्यात फेकून न देता कुत्र्यांसाठी राखून ठेवत चला. कुत्रा हा एक प्राणी आहे आणि प्राण्यांनाही जगण्याचा अधिकार आहे. निसर्गाने त्यांची उत्पत्ती केली आहे. तेंव्हा त्यांना मारून निसर्गाशी खेळ करू नका. माणसाप्रमाणे कुत्र्यांनाही भूक लागते तेंव्हा तुम्ही त्यांना फक्त अन्नपाणी द्या निसर्ग त्यांचे काय करायचं ते पाहून घेईल.

भटकी कुत्री ही आपला 80 टक्के वेळ झोपण्यात, आराम करण्यात घालवतात आणि शिल्लक 20 टक्के वेळामध्ये अन्न पाण्याच्या शोधार्थ भटकंती करतात. आपल्याला जशी घरे आहेत तशी रस्ते म्हणजे या भटक्या कुत्र्यांची घरे आहेत. त्यांना त्यांच्या घरातून कोणी हटवू शकत नाही, कायदा ही तसे सांगतो.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.