बेळगाव लाईव्ह:हलगा मच्छे बायपास जमीन संपादना विरोधात शेतकऱ्यांनी दाखल केलेल्या याचिकेवर स्थगिती उठताच ठेकेदाराने रातोरात काम सुरू करण्यासाठी मशिनी आणि जे सी बी आणून ठेवल्या आहेत त्यामुळे बुधवारी काम देखील सुरू होणार आहे.
हलगा मच्छे बायपास प्रकरणात काही शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईचा मोबदला घेतला असल्याने त्याच बरोबर जवळजवळ अर्धे काम पूर्ण झाले आहे.अखेर बेळगाव तालुक्यात जमीन संपादन विरोधात शेतकऱ्यांनी जवळपास दीड दशक चालवलेला हा सुपीक जमीन वाचवण्याचा लढा शमवण्यात प्रशासनाला बऱ्यापैकी यश आले आहे. तरी देखील शेतकरी अजूनही जिंकू किंवा मरू या भावनेने लढण्याच्या तयारीत आहेत.
शेतकरी आंदोलनात पडलेल्या फुटीचा फायदा प्रशासनाने घेत हलगा मच्छे बायपासचे काम मार्गी लावले आहे. युद्ध पातळीवर काम पूर्ण करून हा प्रश्न निकालात काढण्याचा शासनाचा प्रयत्न असणार आहे.
शेतकऱ्यांच्या आंदोलनात पडलेल्या फुटी मुळे आंदोलनातील जान निघून गेल्याची भावना काही अंदोलकानाकडून व्यक्त होत आहे एका बाजूला विकास होत असला तरी दुसऱ्या बाजूने तीबार पिके घेणारी पिकाऊ जमीन नष्ट होत असल्यामुळे नैसर्गिक साधनांची हानी होत आहे हे देखील तितकेच खरे आहे.
या दोन्ही गोष्टीचा विकास आणि नैसर्गिक साधनांची जपणूक यांच्या पर्यावरणीय दृष्टिकोनातून प्रशासनाने विचार करणे अगत्याचे आहे. केवळ शेतकरी आंदोलन मोडून काढले व रस्ता केला हे प्रशासनाचे यश असता कामा नये करा शहराचा पर्यावरणीय तोल ढळत चालला आहे उष्णता वाढली आहे पाऊस कमी होत आहे याकडेही तितक्याच गंभीरने लक्ष देणे गरजेचे आहे.