बेळगाव लाईव्ह :सांबरा (ता. जि. बेळगाव) येथील श्री महालक्ष्मी यात्रा आणि रथोत्सवाच्या निमित्ताने उद्या बुधवार दि. 29 व गुरुवार दि. 30 मे 2024 रोजी सकाळी 11 वाजता भव्य जंगी बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर शर्यतीसाठी एकूण 17 रोख रकमेची बक्षिसे पुरस्कृत करण्यात आली आहेत. ही बक्षीस अनुक्रमे रुपये 35000, 31000, 25000, 21000, 18000, 16000, 14000, 12000, 10000, 9000, 8000, 7000 6000, 5000, 4000 3000
आणि 2500 रुपये याप्रमाणे असतील. तरी शर्यतीमध्ये भाग घेऊ इच्छिणाऱ्या हौशी बैलगाडी मालकांनी अधिक माहिती व नांव नोंदणीसाठी सचिन (9686220900) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.