Sunday, June 16, 2024

/

काविळीवरील औषधासाठी रुग्णांची फूटपाथवर रांग

 belgaum

बेळगाव लाईव्ह :सध्या शहरात काविळीची साथ वाढली असून डॉक्टरांच्या दवाखान्यात रुग्णांची गर्दी होऊ लागली आहे. कावीळीवरील औषध घेण्यासाठी टिळकवाडी येथील डॉ. सतीश याळगी यांच्या दवाखान्यासमोर आज सकाळी रुग्णांची भली मोठी रांग पाहायला मिळाली.

टिळकवाडी येथील डॉ. सतीश याळगी हे फार पूर्वीपासून काविळीच्या विकारावर रामबाण औषध देणारे डॉक्टर म्हणून सुप्रसिद्ध आहेत.

बेळगाव शहरातील ज्येष्ठ अनुभवी डॉक्टरांपैकी एक असलेले डॉ. सतीश याळगी आणि त्यांच्या आधी त्यांचे वडील देत असलेल्या औषधी वनस्पतीच्या काढ्यामुळे आजतागायत लाखो रुग्ण काविळीच्या विकारातून खडखडीत बरे झाले आहेत.

 belgaum

परिणामी कावीळ म्हंटले की शहरातील विशेष करून टिळकवाडी भागातील नागरिकांना डॉ. याळगी आठवतात.Rush

त्यामुळेच आज गुरुवारी सकाळी टिळकवाडी पहिल्या रेल्वे गेट जवळ काँग्रेस रोडवर असलेल्या डॉ. सतीश याळगी यांच्या दवाखान्याच्या ठिकाणी काविळीचे औषध घेण्यासाठी रुग्णांची गर्दी झाली होती.Samarth

त्यामुळे चित्रपटाच्या तिकिटासाठी लागते तशी डॉ. याळगी यांच्या दवाखान्यासमोरील फुटपाथवर रुग्णांची भली मोठी रांग लागल्याचे पहायला मिळत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.